ChatGPT Down : AI चॅटबोट अचानक झाले डाऊन, यूजर्सच्या समस्या वाढल्या! कामं झाली ठप्प
टेक कंपनी ओपनएआयच्या मालकीचे एआय चॅटबोट ChatGPT अचानक डाऊन झाले आहे. 17 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास यूजर्सना चॅटजीपीटीचा वापर करण्यात समस्या येऊ लागल्या आहेत. मेसेज पाठवण्यात, प्रॉम्प्ट किंवा ईमेज क्रिएट करण्यात आणि रिफ्रेश करताना यूजर्सना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांची कामं देखील ठप्प झाली आहेत. कारण सध्याच्या काळात अशी अनेक लोकं आहेत ज्यांची बरीच कामं चॅटजीपीटीवर अवलंबून आहेत. मात्र चॅटजीपीटी अचानक डाऊन झाल्याने यूजर्स वैतागले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, चॅटजीपीटीचा वापर करण्यात काही यूजर्सना तात्पुरत्या समस्या आल्या होत्या. ही समस्या विशेषत: भारतातील यूजर्सना आली असल्याचे सांगितलं जात आहे. काहीवेळा चॅटीजीपीटी स्लो होते किंवा एरर पाहायला मिळतो. मात्र ही समस्या अतिशय सामान्य असल्याचे अनेकांचे म्हणणं आहे. सध्या यूजर्सना आलेल्या समस्येवर OpenAI ने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे ही समस्या फार मोठी नसल्याचे सांगितलं जात आहे. यापूर्वी देखील चॅटजीपीटी अनेकदा डाऊन झाला होता. सर्व्हर लोड, नेटवर्क समस्या आणि तात्पुरता तांत्रिक बिघाड यासांरख्या समस्यांमुळे चॅटजीपीटी डाऊन होते.
ओपनएआयच्या मालकीचे एआय चॅटबोट चॅटजीपीटी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. प्रत्येक कामासाठी चॅटजीपीटीचा वापर केला जातो. अगदी शाळेतील मुलांपासून ऑफीसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण चॅटजीपीटीचा वापर करत असते. चॅटजीपीटीच्या मदतीने फोटो क्रीएट करणं, फोटो एडीट करणं, गणित सोडवणं, प्रश्नांची उत्तरं मिळवणं, आर्टिकल लिहीणे अशी अनेक कामं पूर्ण केली जाऊ शकतात. चॅटीजीपीटीमुळे अनेक कामं करणं अगदी सहज शक्य होतं. वेळ वाचतो तसेच क्रिएटिव्हिटी देखील पाहायला मिळते. मात्र जेव्हा चॅटीजीपीटी अचानक डाऊन होते, अनेक यूजर्सची काम ठप्प होतात.






