डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 50MP कॅमेऱ्यासह Oppo चा तगडा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Oppo F33 Pro 5G स्मार्टफोन 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 40,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाइस फ्लिपकार्ट आणि ओप्पो इंडियाच्या ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करता येईल. हा फोन मिस्टी फॉरेस्ट, पॅशन रेड आणि स्टारी ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
नव्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर Oppo F33 Pro 5G मध्ये 6.57-इंच फुल-एचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1,400 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. हा हँडसेटला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP66 + IP68 + IP69K रेटिंग दिली आहे.
फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 6360 मॅक्स चिपसेट दिला आहे, जो 6nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये माली-जी57 एमसी2 जीपीयू, 8 जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे.
फोटोग्राफीसाठी Oppo F33 Pro 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच फोनमध्ये ओवी50डी40 सेंसर, f/1.8 अपर्चर, 76-डिग्री फील्ड ऑफ व्यू आणि ऑटोफोकसची सुविधा दिली जाणार आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, जो f/2.0 अपर्चरसह येतो.
ओप्पोच्या नव्या फोनमध्ये 80W सुपरवूक वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.






