Amazfit T-Rex Ultra 2 भारतात लाँच! 30 दिवसांची बॅटरी आणि 180+ स्पोर्ट्स मोडसह मिळणार हे फीचर्स, किंमत वाचून व्हाल थक्क

Amazfit T-Rex Ultra 2 Launched: नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करताय? Amazfit एक असे स्मार्टवॉच घेऊन आले आहे, ज्याची डिझाईन अतिशय आकर्षक आहे. या स्मार्टवॉचची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे.
Amazfit T-Rex Ultra 2 भारतात लाँच! 30 दिवसांची बॅटरी आणि 180+ स्पोर्ट्स मोडसह मिळणार हे फीचर्स, किंमत वाचून व्हाल थक्क
Amazfit T-Rex Ultra 2 भारतात लाँच! 30 दिवसांची बॅटरी आणि 180+ स्पोर्ट्स मोडसह मिळणार हे फीचर्स, किंमत वाचून व्हाल थक्क
Published on: 
Updated on: 
  • Amazfit T-Rex Ultra 2 हे रग्ड डिझाइनसह आलेले प्रीमियम स्मार्टवॉच असून 180+ स्पोर्ट्स मोड आणि प्रगत हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स देतं.
  • 1.5-इंच एमोलेड डिस्प्ले, टायटॅनियम बॉडी, 10ATM वॉटर रेसिस्टन्स आणि ड्युअल-बँड जीपीएसमुळे हे आउटडोअर वापरासाठी मजबूत पर्याय ठरतं.
  • 870mAh बॅटरीमुळे 30 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप, ब्लूटूथ कॉलिंग आणि 64GB स्टोरेजसह हे स्मार्टवॉच ₹49,999 मध्ये उपलब्ध आहे.

Amazfit T-Rex Ultra 2 स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. हे नवे स्मार्टवॉच एक रग्ड मॉडेल आहे, ज्याला आउटडोर वापर करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचमध्ये अनेक सेंसर दिले आहेत, जे हार्ट रेट, ब्लड ऑक्सीजन लेवल (SpO2), स्ट्रेस आणि झोपेसंबंधित डेटा ट्रॅक करतात. Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये 180 हून अधिक स्पोर्ट्स मोड दिले आहेत. कंपनीच्या नव्या स्मार्टवॉचची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे.

भारतात Amazfit T-Rex Ultra 2 ची किंमत

भारतात Amazfit T-Rex Ultra 2 ची किंमत 49,999 रुपये ठेवली आहे. हे स्मार्टवॉच ब्लॅक मॅग्मा कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक अमेजफिट इंडियाच्या वेबसाईटवरून डिव्हाईस खरेदीस करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – Amazfit)

Amazfit T-Rex Ultra 2 चे फीचर्स

Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये 1.5 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 480x480 पिक्सेल, पिक्सेल डेंसिटी 322ppi आणि पीक ब्राइटनेस 3,000 निट्सपर्यंत आहे. डिस्प्लेवर सफायर ग्लासचे कोटिंग आहे. या स्मार्टवॉचची बॉडी ग्रेड 5 टाइटेनियमने तयार करण्यात आली आहे आणि यामध्ये पाण्यापासून सुरक्षेसाठी 10ATM पर्यंत रेटिंग दिली आहे. यामध्ये 64GB स्टोरेज दिले आहे. हे स्मार्टवॉच 26mm च्या सिलिकॉन स्ट्रॅपने सुसज्ज आहे.

कनेक्टिविटीसाठी, Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये वाय-फाय 2.4 गिगाहर्ट्झ, ब्लूटूथ 5.2 आणि बीएलईची सुविधा दिली आहे. हे लेटेस्ट लाँच स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंगला देखील सपोर्ट करते. ज्यामुळे यूजर्स थेट त्यांच्या मनगटावरून कॉल करू शकतात आणि रिसीव्ह करू शकतात. हेल्थ ट्रॅक करण्यासाठी या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, SpO2, स्ट्रेस, स्कीन टेम्परेचर, स्लीप आणि मेंस्ट्रुअल साइकिल मॉनिटर करण्यासाठी सेंसर दिले आहेत. यामध्ये एक 'वन-टॅप' फीचर देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे तुम्ही संपूर्ण डेटा अगदी सहज पाहू शकता. हे स्मार्टवॉच ब्रीदिंग एक्सरसाइज आणि एल्टीट्यूड अलर्ट देखील देते. यामध्ये बायोट्रॅकर 6.0 पीपीजी बायोमेट्रिक सेंसर समाविष्ट आहे.

Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये सहा सॅटेलाइट सिस्टमसह डुअल-बँड जीपीएस आहे. नेव्हिगेशनसाठी हे डिव्हाईस ऑफलाइन मॅप्स आणि अल्टीमीटर आणि जायरोस्कोप सारख्या अनेक सेंसरला सपोर्ट करते. हे सेडेंटरी रिमाइंडर, वेदर अलर्ट आणि इतर सुविधा देखील ऑफर करते. या वियरेबलमध्ये दोन-लाइट टॉर्च देखील आहेत.

फिटनेस प्रेमींसाठी Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये 187 स्पोर्ट्स मोड दिले आहेत. यामध्ये 64GB स्टोरेज समाविष्ट आहे. हे झेप ॲपशी सुसंगत आहे आणि यूजर जोडलेल्या ॲपद्वारे विविध अलर्ट चालू करू शकतात. Amazfit T-Rex Ultra 2 मध्ये 870mAh बॅटरी दिली आहे. याबाबत असा दावा केला जात आहे की, डिव्हाईस रोजच्या वापरात 30 दिवस चालते. असं सांगितलं जात आहे की, जास्त वापर केल्यास डिव्हाईस 15 दिवस चालते. तसेच अलवेज ऑन डिस्प्ले मोड सुरु असल्यास डिव्हाईस 10 दिवस सुरु राहते.