Honor X5d ने वेधले सर्वांचे लक्ष! बजेट किंमतीत मिळणार प्रीमियम अनुभव, डिझाईन पाहून टेकप्रेमी उत्सुक
AI+ चा नवा धमाका! 6,000mAh बॅटरीसह लाँच केले स्वस्त 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Honor X5d सीरीजमधील दोन्ही स्मार्टफोन्स एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. Honor X5d Plus स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत MYR 459 म्हणजेच सुमारे 11,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर स्टँडर्ड मॉडेलच्या Honor X5d 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत MYR 369 म्हणजेच सुमारे 9,000 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवरून ग्राहक हे दोन्ही डिव्हाईस खरेदी करू शकतात. Honor X5d Plus आणि Honor X5d मिडनाइट ब्लॅक आणि टाइडल ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य –Honor)
स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीने लाँच केलेले दोन्ही लेटेस्ट डिव्हाईस अँड्रॉईड 15-बेस्ड मॅजिकओएस 9.0 ने सुसज्ज आहेत. या हँडसेटमध्ये 6.74-इंच TFT LCD टचस्क्रीन देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये आय कंफर्ट आणि डायनॅमिक डिम्मिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो G81 चिपसेट दिला आहे. तसेच Honor X5d सीरीजमधील हँडसेटमध्ये एआरएम माली जी52 एमसी2 जीपीयू आणि 4GB रॅम दिला आहे. तर Honor X5d मध्ये 64GB स्टोरेज आणि Plus मॉडेलमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज दिले आहे.
Instagram चं भन्नाट फीचर! आता यूजर्सना मिळणार Comment एडीट करण्याचा पर्याय, इतकी असेल टाईम-लिमिट
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Honor X5d फोनमध्ये ड्युअल कॅमेरा आहे. ज्यामध्ये 0.08-मेगापिक्सेलचा QVGA कॅमेरा दिला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. Honor X5d Plus मध्ये 50MP प्रायमरी रियर कॅमेरा सपोर्ट मिळणार आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही लेटेस्ट डिव्हाईसमध्ये 15W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,260mAh बॅटरी दिली आहे.






