Oppo A6s Pro ठरला गेमचेंजर! 5G सपोर्ट आणि 7000mAh बॅटरीसह केली दमदार एंट्री, असे आहेत कॅमेरा फीचर्स
ओप्पोचा नवीन स्मार्टफोन 4 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB+128GB, 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB यांचा समावेश आहे. हा नवा स्मार्टफोन 3 कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये लकी लोटस, मूनलिट नाईट आणि अॅझर स्काय यांचा समावेश आहे. ओप्पो स्मार्टफोनची पहिली विक्री 14 एप्रिलपासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – Oppo)
नव्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, ओप्पो डिव्हाईसमध्ये 6.57-इंच OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एक कॉम्पॅक्ट साइजमध्ये शार्प विजुअल्स ऑफर करतो. फोनमध्ये हॉरिजॉन्टल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे आणि ते प्लॅस्टिक आणि धातू यांच्या मिश्रणातून बनवलेले आहे. फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेट दिला आहे, ज्याला वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले आहे.
अखेर तो क्षण आलाच! स्टायलिश लूक अन् बॅटरीची कमाल… OnePlus च्या दमदार स्मार्टफोनची भारतात एंट्री
डिव्हाईसमध्ये 8GB किंवा 12GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. ज्यासोबत एक 2-मेगापिक्सेलचा सेकेंडरी सेंसर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसमध्ये 5G, वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिला आहे.






