Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या
1998 मध्ये स्टीव जॉब्स यांनी ॲपलची सप्लाय चेन सुधारण्यासाठी टिम कुक यांना कंपनीत बोलावले. टिम कूक यांनी केवळ सप्लाय चेन सुधारली नाही तर कंपनीला जागतिक स्थरावर पोहोचवले. मात्र स्टीव जॉब्स यांच्या निधनानंतर कंपनीच्या भविष्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावेळी टिम कूक यांनी कंपनीची धुरा हाती घेतली आणि आपल्या संयमी आणि धैर्यवान नेतृत्वाने सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवले. (फोटो सौजन्य – AI Created)
टिम कूक यांच्या कार्यकाळात ॲपलचा रेवेन्यू तब्बल 4 पट वाढला. कंपनीचे मूल्य 4 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले. टिम कूक यांच्या नेतृत्वाखाली ॲपल वॉच आणि ‘सर्व्हिसेस’ (सेवा) यांसारखे नवीन व्यावसायिक विभाग सुरू करण्यात आले. या सर्व कार्यकाळानंतर आता टिम कूक यांनी सिईओ पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. यानंतर ते ‘एक्झिक्युटिव्ह चेअरमन’ म्हणून कंपनीशी जोडलेले राहतील.
टिम कुक यांच्यानंतर जॉन टर्नस कंपनीच्या सिईओ पदाची धुरा हाती घेणार आहेत. 51 वर्षीय टर्नस 2001 मध्ये डिझाईन टिमसोबत जोडले होते आणि तेव्हापासून कंपनीचा प्रत्येक मोठा प्रोडक्ट जसे आईपॅड, एयरपॉड्स आणि आयफोन डेव्हलप करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली आहे. आता जॉनी सरौजी ॲपलचे नवीन चीफ हार्डवेयर ऑफिसर असणार आहेत. टर्नस यांना हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील तज्ज्ञ मानले जाते. स्वत: टिम कूक यांनी टर्नस कंपनीसाठी योग्य उत्तराधिकारी असल्याचे म्हटलं आहे. टर्नस 1 सप्टेंबरपासून कंपनीच्या सिईओ पदाची धुरा हाती घेणार आहेत आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये देखील समाविष्ट होणार आहेत.






