सिम ॲक्टिव ठेवण्यासाठी हे आहेत BSNL चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स! किंमत केवळ 99 रुपयांपासून सुरु; वाचा संपूर्ण यादी

BSNL Recharge Plan: बीएसएनएल यूजर्सना विविध स्वस्त रिचार्ज प्लॅन्स ऑफर करतो. अशाच काही रिचार्ज प्लॅन्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या प्लॅन्सची किंमत, व्हलिडीटी आणि त्यामध्ये मिळणारे फायदे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
सिम ॲक्टिव ठेवण्यासाठी हे आहेत BSNL चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स! किंमत केवळ 99 रुपयांपासून सुरु; वाचा संपूर्ण यादी
सिम ॲक्टिव ठेवण्यासाठी हे आहेत BSNL चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स! किंमत केवळ 99 रुपयांपासून सुरु; वाचा संपूर्ण यादी
Published on: 
Updated on: 
  • बीएसएनएलच्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती कमी आणि फायदे जास्त

  • 99 रुपयांचा प्लॅन 14 दिवसांची सर्विस व्हॅलिडीटी ऑफर करतो

  • हे प्लॅन्स सिम ॲक्टिव ठेवण्यासाठी स्वस्त आणि मस्त पर्याय

भारतातील सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) त्यांच्या यूजर्सना नेहमीच कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लॅन्स ऑफर करत असते. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलच्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती कमी असतात आणि यामध्ये जास्त फायदे देखील मिळतात. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या तीन रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत अनुक्रमे 99, 107 आणि 202 रुपये आहे. हे प्लॅन्स सिम ॲक्टिव ठेवण्यासाठी स्वस्त आणि मस्त पर्याय आहेत. या प्लॅन्समध्ये किती दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते आणि कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

सिम ॲक्टिव ठेवण्यासाठी हे आहेत BSNL चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स! किंमत केवळ 99 रुपयांपासून सुरु; वाचा संपूर्ण यादी
Jio Recharge Plan: 700 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे... जिओचा 'हा' प्लॅन पाहून यूजर्स चकित, इतकी आहे व्हॅलिडिटी

बीएसएनएलचा 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या यादीमधील पहिल्याच रिचार्ज प्लॅनची किंमत 99 रुपये आहे. हा एक स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. 99 रुपयांचा प्लॅन हा सध्या भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध असलेला सर्वात स्वस्त प्लॅन आहे. हा प्लॅन 14 दिवसांची सर्विस व्हॅलिडीटी ऑफर करतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 50MB डेटा मिळणार आहे. 99 रुपयांचा हा STV विशेषत: अशा लोकांसाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांना व्हॉईस कॉलिंगची गरज आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

बीएसएनएलचा 107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

यादीमधील दुसऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 107 रुपये आहे. 99 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत 107 रुपयांच्या प्लॅनमध्ये जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. 107 रुपयांच्या बीएसएनएल रिचार्ज प्लॅनमध्ये 20 दिवसांची सर्विस व्हॅलिडीटी मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 3GB फ्री डेटा मिळणार आहे. 3GB डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 40 Kbps होणार आहे. या प्लॅनमध्ये 200 मिनिटांची व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. हे सर्व प्लॅन संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत आणि जर तुम्ही 4G नेटवर्कशी जोडलेले राहण्यासाठी एखादा परवडणारा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही या प्लॅन्सचा वापर करून रिचार्ज करू शकता.

सिम ॲक्टिव ठेवण्यासाठी हे आहेत BSNL चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स! किंमत केवळ 99 रुपयांपासून सुरु; वाचा संपूर्ण यादी
अखेर प्रतिक्षा संपली! WhatsApp यूजर्ससाठी मेसेज शेड्यूल फीचर रोलआऊट... कसं करणार काम? जाणून घ्या

बीएसएनएलचा 202 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये 202 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 300 मिनिटांचे व्हॉईस कॉलिंग ऑफर केले जाते. याशिवाय, या प्लॅनमध्ये 5GB FUP (फेयर यूसेज पॉलिसी) डेटा मिळणार आहे. इंटरनेट डेटा संपल्यानंतर स्पीड 40 Kbps होणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये 100 एसएमएस देखील बंडल करण्यात आले आहेत. यासोबतच या प्लॅनमध्ये इंश्योरेंस बेनिफिट देखील मिळणार आहे. एक प्रकारे हा प्लॅन म्हणजेच बीएसएनएलचे एक स्पेशल टॅरिफ वाउचर (STV) आहे.