काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच... प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?
अधिक चिंताजनक बाब म्हणजे, या ॲपमध्ये वेब ब्राउझिंगऐवजी एआय (AI) अवतारांसह चॅट-स्टाईल इंटरफेस आणि मोठ्या प्रमाणात जाहिराती देण्यात आल्या होत्या; यामुळे गुगलच्या ॲप तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, गुगल क्रोमशी हुबेहूब मिळता-जुळता असलेला हा बनावट ॲप अधिकृत गुगल प्ले स्टोअरवरील सर्च रिजल्ट्समध्ये पाहायला मिळाला आहे. या बनावट ॲपचे नाव आणि लोगो ओरिजीनल क्रोम ॲपसारखाच होता. मात्र हा बनवाट ॲप एका वेगळ्या ॲप डेव्हलपरद्वारे लिस्ट करण्यात आला होता, ज्याचे नाव ‘Hizbartech’ आहे. पोस्टमध्ये पुढे सांगितलं आहे की, हे बनावट ॲप सर्च रिजल्ट्समध्ये ‘स्पॉन्सर्ड’ (प्रायोजित) लिस्टिंग म्हणून दिसत होते आणि ते अगदी अस्सल क्रोम ॲपच्या वरच्या बाजूला होते.
पोस्टवर करण्यात आलेल्या काही कमेंट्सनुसार, हे ॲप पहिल्यांदा 22 ऑगस्ट रोजी बॉल बाऊंस नावाचे गेमिंग ॲप म्हणून लिस्ट झाले होते. यानंतर 30 सप्टेंबर रोजी या ॲपचे नाव आणि लोगो बदलून गूगल क्रोमसारखेच करण्यात आले. ज्या यूजर्सनी हे ॲप इंस्टॉल केले आहे, त्यांनी त्यांचा अनुभव शेअर करताना कथितपणे सांगितलं की, हा ॲप म्हणजे कोणताही गेम किंवा कोणते ब्राऊझर नव्हते. याऐवजी, हे ॲप एआय (AI) अवतारांसह एक चॅट-स्टाईल इंटरफेस ओपन करत होते आणि स्क्रीनवर जाहिराती दिसत होत्या. या ॲपने कोणते पासवर्ड्स चोरी केले आहेत किंवा फोनमध्ये मालवेअर इंस्टॉल केला आहे, याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
नुकत्याच घडलेल्या या प्रकरणानंतर आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, या ॲपने गूगलचे सेफ्टी चेक्स कसे पास केले, तसेच या ॲपच्या नावात आणि लोगोमध्ये झालेल्या बदलांचे योग्य पद्धतीने रिव्ह्यू करण्यात आले नाही का? दुसरी चिंता या ॲपच्या पेड प्रमोशनच्या वापराबाबत आहे. कारण एका सुप्रसिद्ध गुगल उत्पादनाशी साधर्म्य असूनही, या लिस्टिंगने अव्वल स्थान मिळवले. मात्र आता हे ॲप गूगल प्ले स्टोअरवरून हटवले असल्याचे सांगितलं जात आहे.
Ans: होय. दिलेल्या रिपोर्टनुसार, Google Chrome सारखे नाव आणि लोगो असलेले संशयास्पद ॲप Google Play Store वर आढळले होते. हे ॲप दुसऱ्या डेव्हलपरने प्रकाशित केले होते.
Ans: रिपोर्टनुसार, या ॲपचे नाव आणि लोगो अधिकृत Google Chrome ॲपसारखे होते. हे ॲप ‘Hizbartech’ या डेव्हलपरच्या नावाने लिस्ट करण्यात आले होते.
Ans: दिलेल्या रिपोर्टनुसार, हे ॲप Google Play Store वरून हटवण्यापूर्वी १ लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले होते.






