Flipkart-Amazon Sale 2025: 5G फोन्सचा धमाका! सेलमध्ये मिळवा जबरदस्त ऑफर, 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा नवीन स्मार्टफोन
भारतात सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. सणानिमित्त लोकं मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यानिमित्ताने अनेक ठिकाणी खरेदीवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट देखील उपलब्ध असतं. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि प्लॅटफॉर्मवर सध्या अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. या ऑफर्ससह ग्राहक 10 हजारांहून कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉन आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. 10 हजार रुपयांच्या किंमतीत तुम्हाला असे डिव्हाईस खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर सुरु असलेल्या या ऑफर्स आणि डिस्काऊंटबाबत जाणून घेऊया.
फोन आणि फ्लशची जोडी ठरत आहे ‘घातक’! नव्या अभ्यासाने उघड केले धक्कादायक सत्य, डॉक्टरांनी दिलाय इशारा
फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये iQOO Z10 लाइट 5G अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. आता तुम्ही हे डिव्हाईस केवळ 9,982 रुपयांत खरेदी करू शकणार आहात. या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक 6300 प्रोसेसर, 4GB रॅम + 128GB स्टोरेज, 6.74 इंच स्क्रीन 90Hz IPS LCD डिस्प्ले, 50MP + 2MP रियर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 15W चार्जिंगसह 6000mAh बॅटरी आणि Android 15 चा सपोर्ट देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये Vivo T4 Lite 5G हा स्मार्टफोन केवळ 9,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 6300 प्रोसेसर, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6.74 इंच 90Hz LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP + 2MP रियर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 15W चार्जिंगसह 6000mAh बॅटरी आणि Android 15 चा सपोर्ट देण्यात आला आहे.
फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन सेलमध्ये केवळ 8,499 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 प्रोसेसर, 6GB/8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6.88 इंच 120Hz HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 50MP रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, 18W चार्जिंगसह 5160mAh बॅटरी देण्यात आली आहे.
अॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये सॅमसंगचा हा फोन केवळ 7,499 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 6300 प्रोसेसर, 4GB/6GB रॅम + 128GB स्टोरेज, 6.74 इंच 90Hz HD+ PLS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 50MP + 2MP रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, 25W चार्जिंगसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
या यादीतली शेवटचा स्मार्टफोन आहे Realme Narzo 80 Lite 5G. अॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत केवळ 9,898 रुपये ठेवण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये मीडियाटेक 6300 प्रोसेसर, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6.67 इंच 120Hz HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 32MP चा डुअल रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, 15W चार्जिंगसह 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.