Vivo TWS 5: हलके, दमदार आणि स्टायलिश... 48 तासांचा बॅटरी बॅकअप आणि सुपर साउंड क्वालिटीसह Vivo चे नवीन इअरबड्स लाँच
Vivo TWS 5 सीरीज ईयरबड्स लाँच केले आहेत. वीवोने त्यांचे हे लेटेस्ट TWS ईयरबड्स चीनमध्ये फ्लॅगशिप Vivo X300 सीरीजसह लाँच केले आहे. Vivo TWS 5 सीरीज दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत, ज्यामध्ये TWS 5 आणि TWS 5 Hi-Fi यांचा समावेश आहे. विवोने दावा केला आहे की, हे ईयरबड्स 60dB पर्यंत एंबिएंट नॉइस कमी करू शकतात. आता आम्ही तुम्हाला कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट ईयरबड्सबद्दल माहिती देणार आहोत.
Vivo TWS 5 सीरीज दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.
स्टँडर्ड व्हेरिअंट: 399 युआन (सुमारे ₹4,500)
Hi-Fi व्हेरिअंट: 499 युआन (सुमारे ₹5,500)
Vivo TWS 5 डिव्हाईस सिंपल व्हाइट, प्योर ब्लॅक आणि स्मोकी पर्पल कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. तर TWS 5 Hi-Fi ईयरबड्स डीप सी ब्लू आणि आव्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – X)
Vivo TWS 5 सीरीज ईयरबड्समध्ये 11mm चा ड्राइवर देण्यात आला आहे. TWS 5 Hi-Fi व्हेरिअंट मध्ये LDAC, LHDC, AAC, SBC आणि LC3 कोडक्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. स्टँडर्ड Vivo TWS 5 मध्ये LDAC, AAC, SBC आणि LC3 ऑडिओ कोडेक्सचा सपोर्ट आहे. दोन्ही ईयरबड्समध्ये Active Noise Cancellation (ANC) सपोर्ट असून, हे 60dB पर्यंत सभोवतालचा आवाज कमी करतात.
Vivo TWS 5 सीरीजचे ईयरबड्स 42ms लेटेंसी रेट ऑफर करतात. यासोबतच याला Hi-Res ऑडियो सर्टिफिकेशन मिळाले आहे आणि हे DeepX 4.0 स्टीरियो साउंड ऑफर करतात. यामध्ये Bluetooth 5.4 कनेक्टिविटीचा सपोर्ट देण्यात आला आहे, जो 10 मीटरपर्यंत ऑपरेटिंग रेंज ऑफर करतो. हे ईयरबड्स IP54-सर्टिफाइड आहेत.
Vivo TWS 5 सीरीजच्या ईयरबड्समध्ये तीन माइक्रोफोन देण्यात आले आहेत, जे AI बेस्ड कॉल नॉइस रिडक्शन सिस्टमसह येतात. Vivo TWS 5 आणि TWS 5 Hi-Fi दोन्ही डिव्हाईसमध्ये ट्रिपल कनेक्शन सपोर्ट आणि स्मार्ट ट्रांसलेशन फीचर उपलब्ध आहे. यामध्ये टच कंट्रोल देखील देण्यात आले आहे.
बॅटरी लाईफच्या बाबतीत, Vivo चा दावा आहे की हे ईयरबड्स
ANC चालू असताना: एकदा चार्ज केल्यावर 6 तास आणि केससह 24 तास बॅटरी लाईफ देतात.
ANC बंद असताना: एकदा चार्ज केल्यावर 12 तास आणि केससह 48 तास बॅटरी लाईफ मिळते.
Vivo TWS 5 सीरीजमध्ये दमदार बॅटरी, उत्कृष्ट साउंड क्वालिटी आणि नॉइस कँसिलेशन फीचर्ससह प्रीमियम अनुभव मिळतो. बॅटरी लाईफच्या बाबतीत, Vivo चा दावा आहे की ते ANC चालू असताना एकदा चार्ज केल्यावर 6 तास आणि केससह 24 तास बॅटरी लाईफ देते. ANC बंद असताना, बॅटरी लाईफ एकदा चार्ज केल्यावर 12 तास आणि केससह 48 तास असते.