'ही' कंपनी घेऊन आलीये 'Gadgets Sale'! जबरदस्त कॅमेरा आणि टॉप क्लास परफॉर्मंस, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हे 5 स्मार्टफोन
तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा किंवा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत आहात का? तर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. या काळात तुम्ही नवीन स्मार्टफोनच्या खरेदीवर उत्तम बचत करू शकता. कारण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म प्लिपकार्ट त्यांच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी ‘Gadgets Sale’ घेऊन आला आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या ग्राहकांसाठी OMG गॅझेट्स सेल आणला आहे ज्यामध्ये अनेक महागडे फोन स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये असे अनेक उत्तम फोन उपलब्ध आहेत ज्यात जबरदस्त कॅमेरा आणि टॉप क्लास परफॉर्मंस आहे.
One UI 7: Samsung युजर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ स्मार्टफोन्सना मिळणार नवं अपडेट, लिस्ट आली समोर
या महिन्यात लाँच करण्यात आलेला SAMSUNG Galaxy F16 5G डिव्हाइस सध्या फ्लिपकार्ट सेलमध्ये खूपच स्वस्त किमतीत उपलब्ध आहे. हे डिव्हाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 21 टक्क्यांपर्यंत सूटसह उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन कोणत्याही ऑफरशिवाय फक्त 12,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, तर Axis Bank Credit Card सह, तुम्हाला फोनवर 1000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळत आहे. फोनवर एक खास एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे ज्याद्वारे तुम्ही अतिरिक्त पैसे वाचवू शकता. या फोनमध्ये 50MP + 5MP + 2MP रियर आणि 13MP फ्रंट कॅमेरा आणि Dimensity 6300 प्रोसेसर आहे. (फोटो सौजन्य – X)
Realme चा हा फोन सेलमध्ये खूप स्वस्तात उपलब्ध आहे. सध्या तुम्ही हा फोन कोणत्याही ऑफरशिवाय फक्त 14,488 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह, तुम्ही या फोनवर 1250 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या फोनमध्ये 50MP रिअर कॅमेरा आणि या सेगमेंटमधील सर्वात वेगवान Dimensity 7300 Energy 5G चिपसेट आहे.
फ्लिपकार्ट सेलमध्ये Motorola g64 5G च्या खरेदीवर 22 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे. डिस्काऊंटनंतर तुम्ही हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. तर HDFC बँक क्रेडिट कार्ड नॉन EMI आणि Axis बँक क्रेडिट कार्ड नॉन EMI पर्यायांवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.
अलीकडेच लाँच करण्यात आलेला realme P3x 5G स्मार्टफोन देखील तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा स्मार्टफोन खूप पावरफुल आहे. तुम्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना खरेदी करू शकता. सर्व बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील फोनवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. या फोनमध्ये 50MP रिअर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि सॅमसंगचा Dimensity 6400 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 50MP + 8MP चा रिअर कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा आणि Dimensity 7025 प्रोसेसर आहे.
या सेलमध्ये vivo फोन देखील खूप स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. कंपनी सध्या हा फोन कोणत्याही ऑफरशिवाय 14,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी देत आहे, तर हा फोन 19,499 रुपयांना सादर करण्यात आला होता. या डिव्हाइसमध्ये 50MP + 2MP रियर 8MP फ्रंट कॅमेरा आणि Dimensity 7300 5G प्रोसेसर आहे.