

फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्ससाठी फनी रिंग नावाचा एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मजेदार फनी बंडल मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये बबल ट्रबल बंडल, एम्परर्स न्यू क्लोद्स बंडल इत्यादींचा समावेश आहे. बंडलव्यतिरिक्त या ईव्हेंटमध्ये इतर काही रिवॉर्ड्सचा देखील समावेश आहे. जर तुम्हाला ईव्हेंटमधील हे रिवॉर्ड्स क्लेम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या नवीन ईव्हेंटमध्ये नक्कीच सहभागी होऊ शकता. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत, रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आणि हा ईव्हेंट गेममध्ये पुढील किती दिवस लाईव्ह असणार आहे, याबाबत जाणून घेऊया.
गेममध्ये सुरु झालेल्या नवीन रिंग ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना फनी बंडल रिवॉर्ड्स स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट गेममध्ये पुढील 2 आठवड्यांसाठी लाईव्ह असणार आहे. तुम्ही या या 2 आठवड्यांच्या कालावधीत कधीही गेममध्ये सहभागी होऊ शकता. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 ऐवजी केवळ 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमचे डायमंड्स खर्च करावे लागतील.