Honor ने पुन्हा केला धमाका! 12GB रॅम आणि 7,000mAh बॅटरीसह नवा 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत
बजेट कमी अन् फीचर्स भारी! नव्या Redmi स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत पाहून यूजर्स झाले खुश
हॉनर स्मार्टफोन 2 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 6GB+256GB आणि 8GB+ 256GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 6GB+256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 1,899 म्हणजेच सुमारे 26 हजार रुपये आणि 8GB+ 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,099 म्हणजेच सुमारे 28 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. डिव्हाईसच्या टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 31 हजार रुपये आहे, ज्यामध्ये 12GB पर्यंत रॅम मिळणार आहे. या स्मार्टफोनची विक्री कधी सुरु होणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिली नाही. ग्राहक हा स्मार्टफोन अॅझर स्काय, ब्लॅक फॅन्टम नाईट आणि व्हाईट मूनलाइट या रंगात खरेदी करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)
स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 850 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. हँडसेटमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP65 रेटिंग दिले आहे. फोनमध्ये मॅजिकओएस 9 दिला आहे, जो अँड्रॉईड 15 वर आधारित आहे.
कमी किंमतीत तगडा स्मार्टफोन शोधताय? मोठी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेसह REDMI A7 Pro लाँच, वाचाा फीचर्स
Honor च्या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6s जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये एड्रेनो ए619 जीपीयू, 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी हॉनरच्या या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये 8x पर्यंत डिजिटल झूम सपोर्ट देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.






