Google चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत... कंपनीने केली AI उपक्रमांची घोषणा
भारतात ९० दशलक्षांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आहेत. यामध्ये ३४५ दशलक्षांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. तथापि, लहान व्यवसाऱ्यांना पतपुरवठा मिळवणे, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे आणि सरकारी नियमांचे पालन करणे यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना अनुदानातून अशी एआय साधने विकसित केली जातील, जी मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ शकतील. यामुळे लहान व्यवसायांना औपचारिक पतपुरवठा मिळवणे, नवीन ग्राहक आणि बाजारपेठा शोधणे आणि नियामक आवश्यकतांचे पालन करणे सोपे होईल. (फोटो सौजन्य – AI Created)
गुगलच्या मते, एआय शिक्षक आणि तज्ञांचे दैनंदिन काम सोपे करू शकते, ज्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी अधिक वेळ देता येईल, या उद्देशाने, कंपनीने यावर्षी मे महिन्यात भारतात ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ सुरू केली. हा कार्यक्रम शिक्षकांना जेमिनी आणि जेमिनी नोटबुक सारखी एआय साधने कशी वापरायची हे शिकवतो. ही साधने शिक्षकांना पाठांचे नियोजन करण्यास, विद्याथ्यर्थ्यांच्या गरजेनुसार अभ्यास साहित्य तयार करण्यास आणि दैनदिन तयारीवर खर्च होणारा वेळ वाचवण्यास सक्षम करतात.
गुगल कृषी क्षेत्रात एआयचा वापर वाढवण्यासाठी देखील काम करत आहे. कंपनीने भारतीय गरजा लक्षात घेऊन आपले ॲग्रीकल्चरल अंडरस्टँडिंग मॉडेल’ विकसित केले आहे, जे कृषीविषयक माहिती पुरवते. ही मॉडेल्स आता भारतात आणि इतर ११ देशांमध्ये वापरली जात आहेत. गुजरातमध्ये, ॲ म्नेक्सने गुगलच्या कृषी मॉडेलचा एपीआय राज्य सरकारच्या ‘कृषी प्रगती क्रॉप इंटेलिजन्स’ प्लॅटफॉर्मसोबत एकत्रित केला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात या प्रणालीद्वारे ६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ९० कोटींहून (९०० दशलक्ष) अधिक एसएमएस सूचना पाठवण्यात आल्या आहेत. या संदेशांमध्ये पीक आणि जमिनीचे आरोग्य, कीड व रोग प्रतिबंध आणि हवामानातील बदलांविषयी माहिती दिली जाते. कंपनीचे म्हणणे आहे की, ही प्रणाली १ कोटी ४० लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरील कृषीविषयक निर्णय घेण्यास मदत करत आहे. पिकांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत करणे हा याचा उद्देश आहे, याव्यतिरिक्त, एकस्टेप फाउंडेशनच्या नेतृत्वाखालील जागतिक संघ असलेल्या ओपनॲग्रीनेटने गुगलचे एपीआय आपल्या कृषी विश्लेषण डॅशबोर्डमध्ये समाविष्ट केले आहेत.






