काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game... Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?
गूगलचे प्लेग्राऊंड यूजर्सना नैसर्गिक भाषेत देण्यात आलेल्या टेक्स्ट प्रॉम्प्टद्वारे गेम बनवण्याची आणि त्यामध्ये बदल करण्याची सुविधा देते. विशेष म्हणजेच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी यूजर्सना कोडिंगबद्दल माहिती असणं गरजेचं नाही. या तंत्रज्ञानमध्ये गेमची कल्पना सांगण्यासाठी प्रॉम्प्ट लिहीणं गरजेचं आहे आणि प्लॅटफॉर्म याच प्रॉम्प्टच्या आधारे गेम तयार करणार आहे. प्लेग्राऊंडमध्ये गूगलच्या एआय मॉडेल्ससह दुसऱ्या ॲडव्हांस एआय टेक्नोलॉजी आणि कंपनीच्या सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तयार करण्यात आलेला गेम गूगल प्लेग्राऊंडवर पब्लिश देखील केला जाऊ शकतो. या ठिकाणी दुसरे यूजर्स हा गेम डाऊनलोड करू शकतात आणि खेळू शकतात. (फोटो सौजन्य – AI Created)
प्लेग्राऊंडमध्ये युनिटी स्पार्क देखील जोडला जाणार आहे. याला 2026 च्या अखेरीस प्लॅटफॉर्मसोबत इंटीग्रेट करण्याची तयारी सुरु झाली आहे. Unity नुसार, हे जास्त ॲडव्हांस गेम मेकॅनिक्स आणि हाय-क्वालिटी 3D एक्सपीरियंस तयार करण्यासाठी मदत करणार आहे. युनिटी स्पार्कमध्ये काही असेट्स AI चा वापर करून तयार केले जातील, तर बहुतांश प्रतिमा आणि इफेक्ट्स युनिटीच्या विद्यमान लायब्ररीमधून घेतले जातील. कंपनीने असे म्हटले आहे की, ज्या मानवी कलाकारांनी ही मालमत्ता तयार केली आहे, त्यांना श्रेय आणि मोबदला दिला जाईल. प्लेग्राउंड आणि स्पार्क या दोन्हींमध्ये वापराच्या आधारावर मोफत आणि सशुल्क असे दोन पर्याय उपलब्ध असतील.
‘प्लेग्राउंड’ हा गुगलच्या ‘वर्ल्ड मॉडेल्स’ तंत्रज्ञानावर कंपनीने वाढवलेल्या फोकसचा एक भाग आहे. हे एआय टेक्स्ट प्रॉम्प्टच्या आधारे वर्चुअल जग तयार करू शकते आणि ती केवळ भाषा समजण्यापुरती मर्यादित नाही. गुगलने गेल्या वर्षी आपले जागतिक मॉडेल, जिनी 3, लाँच केले होते. जानेवारीमध्ये, कंपनीने जिनीचा वापर करून आभासी जग आणि पात्रे तयार करण्यास सक्षम असलेल्या एका प्रोटोटाइपचे अनावरणही केले होते.






