IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स... वाचा डिटेल्स
मोटोरोला सिग्नेचर 27 स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चिपसेटसह लाँच होणार आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये आर्क्टिकमेश कूलिंग सिस्टिम आणि सिक्स-एंटीना सेटअप देण्यात आला आहे, जो कनेक्टिविटी आणि नेटवर्क सुधारतो. हा वर्कलोड, गेमिंग आणि मल्टीटास्टिंगमध्ये अधिक चांगला परफॉर्मंस ऑफर करतो. (फोटो सौजन्य: X)
The motorola signature 27 first look Powered by Snapdragon 8 Elite Extreme Gen 6 #motorolasignature27 https://t.co/wJcsVFjMa3 — Gogi Tech (Rajeev) (@gogiinc) October 9, 2026
कंपनीच्या आगामी डिव्हाईसमध्ये 50MP सोनी लायटिया 910 प्रायमरी कॅमेरा आणि 200MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. या फोनची कॅमेरा सिस्टिम 3.5-एक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन, क्वालकॉम इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन आणि मोटरोलाच्या व्हिडीओ इन्हेंसमेंट इंजनसह इंप्रूव इमेज क्वालिटी, झूम फोटोग्राफी आणि व्हिडीओ स्टेबिलिटी ऑफर करते. ही कॅमेरा सेटिंग वेगवेगळ्या परिस्थितीत अधिक चांगली इमेज क्वालिटी ऑफर करते.
मोटोरोला सिग्नेचर 27 स्मार्टफोनच्या ऑडिओसाठी कंपनीने बँग अँड ओलुफसेन सोबत पार्टनरशिप केली आहे. बँग अँड ओलुफसेनने पहिल्यांदाच स्मार्टफोनसाठी ऑडियो ट्यून केला आहे. हा ब्रँड त्यांच्या इमर्सिव म्यूजिक, गेमिंग आणि व्हिडीओ प्लेबॅक साउंडसाठी ओळखला जातो. हा फोन अँड्रॉईड 17 वर आधारित इंटीग्रेटेड गूगल जेमिनीच्या एआई पावर्ड असिस्टंटला सपोर्ट करतो. मोटोरोला त्यांच्या आगानी स्मार्टफोनसाठी 7 वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड आणि 7 वर्षांसाठी सिक्योरिटी मेनटेनेंस अपडेट रिलीज करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मोटोरोला सिग्नेचर 27 स्मार्टफोन पँटोन कोल स्मोक आणि पँटोन कॅपूलेट ओलिव कलर ऑप्शनमध्ये लाँच केले जाणाक आहेत. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची किंमत आणि त्याच्या इतर फीचर्स किंवा स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती शेअर केली नाही. हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.






