Google Maps मध्ये मोठा बदल! आता रस्ते दिसणार अधिक स्पष्ट, नेव्हिगेशनचा अनुभव होणार आणखी सोपा

Google Maps New Features: गुगल मॅप्समध्ये लवकरच 'High-Visibility Mode' हे नवे फीचर येण्याची शक्यता आहे. या फीचरमुळे नकाशावरील रस्ते, पाण्याचे साठे आणि हिरवळीचे भाग अधिक स्पष्ट दिसणार आहेत. अँड्रॉइड अॅपच्या 26.48.00.1027729593 या व्हर्जनमध्ये हा पर्याय दिसून आला आहे.
Google Maps New Features
Google Maps New Features (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  • Google Maps चा नवा लूक

  • रस्ते आणि परिसर दिसणार अधिक स्पष्ट

  • डार्क मोडमध्येही मोठा बदल

Google Maps Update: प्रवास करताना रस्ता शोधायला आपण सगळेच गुगल मॅप्स वापरतो. आतापर्यंत मॅपवर आपल्याला ठराविक रंगांचं एकच डिझाईन बघायला मिळत होतं, मात्र लवकरच यात मोठा बदल होणार आहे. गुगल आपल्या नेव्हिगेशन अॅपसाठी एका नव्या 'High-Visibility Mode' वर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर मॅपवरचे रंग आधीपेक्षा वेगळे आणि जास्त स्पष्ट दिसणार आहेत, आणि याचा परिणाम अॅपच्या लाईट आणि डार्क अशा दोन्ही मोडवर दिसेल.

• नव्या लूकमध्ये नेमकं काय बदलणार?

नव्या व्हिज्युअल स्टाईलमध्ये रस्ते, पाण्याचे साठे आणि हिरवळ असलेल्या भागांचे रंग बदलले जात आहेत. यामुळे युजर्सना नकाशा बघायचा एक वेगळा आणि जास्त सोपा अनुभव मिळू शकेल. अर्थात, कंपनीने अजून या फीचरची अधिकृत घोषणा केलेली नाही.

• हा नवा बदल कुठे दिसला?

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, गुगल मॅप्सच्या अँड्रॉइड अॅपच्या '26.48.00.1027729593' या व्हर्जनमध्ये हा High-Visibility Mode दिसून आला आहे.

1. कुठे मिळेल? : हा पर्याय चालू केल्यानंतर तो अॅपच्या 'Map Style' मेनूमध्ये बघायला मिळतो.

2. काय ऑप्शन असतील? : इथे युजर्सना आधीपासून असलेल्या 'Standard' सेटिंगसोबतच हा नवा पर्याय मिळू शकतो.

3. रचना तशीच : या मोडमध्ये नकाशाची मूळ रचना तशीच राहते, फक्त वेगवेगळी ठिकाणं दाखवायला वापरले जाणारे रंग बदलतात.

4. लॉन्च कधी? : गुगलने अजून या फीचरच्या लॉन्चिंगची तारीख सांगितलेली नाही.• डार्क मोडमध्ये दिसणार मोठा फरक या नव्या फीचरचा परिणाम डार्क मोडमध्ये जास्त जाणवतो. रिपोर्टनुसार, या मोडमध्ये मॅपचं बॅकग्राउंड जवळपास पूर्णपणे काळं होतं.

1. रस्त्याची रेषा : नेहमी रस्ता दाखवणाऱ्या निळ्या-हिरव्या रेषेऐवजी जांभळ्या रंगाची रेषा दिसते.

2. आतला रंग : मार्गाच्या आत हलका लॅव्हेंडर रंग वापरला गेलाय.

3. पाणी आणि हिरवळ : पाण्याचे साठे आणि हिरवळीचे भाग आधीपेक्षा जास्त गडद रंगात दिसतात.

4. नावं स्पष्ट : मात्र रस्त्यांची आणि ठिकाणांची नावं नेहमीप्रमाणेच स्वच्छ आणि स्पष्ट वाचता येतात.

• बाकीचे फीचर्स राहणार तसेच हा बदल सध्या फक्त नकाशाच्या बाहेरच्या रूपापुरताच मर्यादित असल्याचं सांगितलं जात आहे.

1. नेव्हिगेशन कंट्रोल्स : नेव्हिगेशन कंट्रोल्स आधीप्रमाणेच राहणार आहेत.

2. सूचना : प्रत्येक वळणावर मिळणाऱ्या सूचना म्हणजे टर्न-बाय-टर्न निर्देश तसेच राहतील.

3. माहिती पॅनल : स्क्रीनच्या तळाशी दिसणारं माहिती पॅनल पण आधीप्रमाणेच कायम राहणार आहे.