कमी किंमतीत तगडा स्मार्टफोन शोधताय? मोठी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेसह REDMI A7 Pro लाँच, वाचाा फीचर्स
फोटोग्राफी होणार अधिक दमदार! Vivo च्या नव्या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा, यूजर्स झाले आनंदी
REDMI A7 Pro स्मार्टफोन 4GB+64GB आणि 4GB+128GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. बेस मॉडेलची किंमत USD 119 म्हणजेच सुमारे 11,100 रुपये आहे, आणि 128GB मॉडेलची किंमत 129.99 युरोपासून सुरू होते. तथापि, शाओमीने म्हटले आहे की अंतिम किंमत आणि उपलब्धता प्रदेशानुसार वेगवेगळी असेल. (फोटो सौजन्य – REDMI)
Redmi A7 Pro स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. REDMI A7 Pro मध्ये 6.9-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्टसह येते आणि याची पीक ब्राइटनेस 800 निट्सपर्यंत वाढवली जाऊ शकते. फोनमध्ये वेट टच टेक्नोलॉजी 2.0 देखील दिली आहे. स्मार्टफोनची डिझाईन अशा प्रकारे केली आहे की यूजरची बोटे ओली किंवा साबणाने माखलेली असली तरीही स्पर्शाला प्रतिसाद कायम राहील.
नवीन स्मार्टफोन एक ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि या डिव्हाईसमध्ये UFS 2.2 स्टोरेज दिले आहे. कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत वर्चुअल रॅम सपोर्ट देखील मिळणार आहे. तसेच Redmi A7 Pro मध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, स्मार्टफोनची बॅटरी 49 तासांपर्यंतचा कॉल टाईम, 35 तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक किंवा 77 तासांपर्यंतचा म्युझिक प्लेबॅक मिळू शकतो.
REDMI A7 Pro च्या मागील बाजूला ड्युअर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर समोरील बाजूला एक सिंगल फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यात HDR+ आणि नाईट मोडचाही सपोर्ट आहे. समोरच्या बाजूला, बिल्ट-इन ब्यूटी फिल्टर्स आणि नाईट मोडसह 8 मेगापिक्सेलचा सेन्सर आहे.






