• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • India Mobile Congress 2024 Will Start From 15th October Its Depend On Ai

AI वर आधारित इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटला आजपासून सुरुवात, 900 स्टार्टअप्स होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटचे उद्घाटन करणार आहेत. इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंट अनेक डिव्हाईस लाँच होण्याची अपेक्षा आहे. AI संदर्भात जगभरात कोणत्या प्रकारचे काम केले जात आहे, याची माहिती देखील या चर्चासत्रात दिली जाणार आहे. इंडियन मोबाईल काँग्रेसची थीम 'द फ्युचर इज नाऊ' आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2024 | 11:42 AM
AI वर आधारित इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटला आजपासून सुरुवात, 900 स्टार्टअप्स होणार सहभागी

AI वर आधारित इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटला आजपासून सुरुवात, 900 स्टार्टअप्स होणार सहभागी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंट आज 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक डिव्हाईस लाँच केले जाणार आहेत. या ईव्हेंटचे संपूर्ण लक्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि जनरेटिव्ह AI वर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ईव्हेंटचे उद्घाटन करणार आहेत. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी दळणवळण क्षेत्राच्या भविष्यातील रोडमॅपचे अनावरण देखील करणार आहेत. इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटमध्ये 900 स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. या स्टार्टअप्समध्ये क्वांटम टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टरशी संबंधितांचा समावेश असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

हेदेखील वाचा- या दिवशी लाँच होणार Honor Magic 7 सिरीज! क्वालकॉमच्या नवीन चिपसेटसह मिळणार AI फीचर्स

आज 15 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या इंडियन मोबाइल काँग्रेस (IMC) ईव्हेंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि जनरेटिव्ह AI (Gen AI) वर खूप लक्ष केंद्रित केले जाणार आहे. हे दोन्ही तंत्रज्ञान दळणवळण सेवांमध्ये नवी क्रांती आणणारे असल्याचे मानले जात आहे.दूरसंचार विभाग (DOT) आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर्स (COAI) यांनी इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटचे आयोजन केले आहे. (फोटो सौजन्य – X)

दूरसंचार विभाग (DOT) आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर्स (COAI) यांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्राद्वारे, AI सारखे तंत्रज्ञान त्यांच्यासाठी संधी आणि आव्हाने कशी निर्माण करू शकते हे सर्वसामान्यांना सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. AI संदर्भात जगभरात कोणत्या प्रकारचे काम केले जात आहे, याची माहिती देखील या चर्चासत्रात दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार

इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंटचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहेत. त्याबाबत सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी दळणवळण क्षेत्रातील भारत सरकारच्या भविष्यातील रोडमॅपचे अनावरण करणार आहेत. विशेषतः, पंतप्रधान मोदी भविष्यात या क्षेत्राचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा प्रभाव पडेल आणि भारताच्या धोरणात्मक गरजा पूर्ण होतील यावर सरकारचे मत मांडण्याची शक्यता आहे. यावेळी इंडियन मोबाईल काँग्रेसची थीम ‘द फ्युचर इज नाऊ’ आहे. त्याचा प्रमुख भागीदार क्वालकॉम आहे.

हेदेखील वाचा- सोशल मिडीयावरील पोस्ट खरी की खोटी? अशा प्रकारे तपास करतात सायबर सुरक्षा एजन्सी, जाणून घ्या

सर्व स्टार्टअप सहभागी होतील

2017 पासून आयोजित करण्यात येत असलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस ईव्हेंटमध्ये यावेळी सरकारने दळणवळण क्षेत्रातील स्टार्टअपला अधिक प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, यामध्ये जवळपास 900 स्टार्टअप्स सहभागी होणार असल्याचे माहिती मिळाली आहे. यापैकी बरेच स्टार्टअप क्वांटम तंत्रज्ञान, वर्तुळाकार अर्थव्यवस्था, क्लाउड आणि इमेज कॉम्प्युटिंग, आईओटीशी संबंधित आहेत. याशिवाय सेमीकंडक्टर आणि सेमीकंडक्टरसारख्या क्षेत्रांशी संबंधित काही स्टार्टअप्सही येथे सहभागी होतील.

संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया त्यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधतील. यावेळच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे IMC सोबत व‌र्ल्ड टेलीकम्यूंनिकेशन स्टँडर्ड असेंब्लीचेही आयोजन करण्यात आले आहे. आयएमसीचे सीईओ रामकृष्ण पी यांनी सांगितलं की ही संधी भारताला जागतिक दळणवळणाच्या जगात आपली क्षमता दाखवण्याची सुवर्ण संधी देईल.

Xiaomi चा नवीन स्मार्टफोन

इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 ईव्हेंट अनेक डिव्हाईस लाँच होण्याची अपेक्षा आहे.Xiaomi 16 ऑक्टोबर रोजी नवीन स्मार्टफोन लाँच शकतो, जो Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. या इव्हेंटमध्ये स्मार्टफोन्सशिवाय टेक्नॉलॉजी गॅजेट्सही दाखवण्यात येणार आहेत.

Web Title: India mobile congress 2024 will start from 15th october its depend on ai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 08:26 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

Nov 19, 2025 | 04:15 AM
ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Nov 19, 2025 | 02:35 AM
प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

प्रशांत किशोर यांची नाव बुडाली पाण्यात; एकही जागा मिळवली नाही बिहारच्या रिंगणात

Nov 19, 2025 | 01:15 AM
Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Nov 18, 2025 | 11:23 PM
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM
I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Nov 18, 2025 | 10:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.