सोशल मिडीयावरील पोस्ट खरी की खोटी? अशा प्रकारे तपास करतात सायबर सुरक्षा एजन्सी, जाणून घ्या
दोन दिवसांपूर्वीच एक घटना घडली होती, ज्यामुळे संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांच्या छातीत आणि पोटात गोळी लागली होती आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेची जबाबदारी बिष्णोई टोळीने घेतली आणि त्यांनी यासंदर्भात सोशल मिडीयावर एक पोस्ट देखील शेअर केली.
हेदेखील वाचा- मुकेश अंबानींची दिवाळी ऑफर! केवळ 12 हजार रुपयांमध्ये घरी घेऊन या हा लॅपटॉप
या पोस्टमध्ये त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली. मात्र आता असा प्रश्न निर्माण होत आहे की ही पोस्ट खरंच बिष्णोई टोळीने केली आहे की दुसऱ्या कोणी? सोशल मिडीयावर करण्यात आलेली ही पोस्ट खरी आहे की खोटी? याच सगळ्यावर आता पोलीस आणि सायबर सुरक्षा एजन्सी तपास करत आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याने फेसबुक पोस्टद्वारे जबाबदारी स्वीकारली असून, त्याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस आणि तपास यंत्रणा अनेक टप्प्यांवर या पोस्टचा तपास करणार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
सोशल मीडिया पोस्टच्या मदतीने आरोपींना ओळखणे किंवा त्यांचा माग काढणे अनेकदा कठीण होऊन बसते. कारण गुन्हेगार अनेकदा बनावट सोशल मिडीया अकाऊंट तयार करतात आणि त्यावरून पोस्ट शेअर करतात. अशा परिस्थितीत पोलीस आणि तपास यंत्रणांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात मोठी अडचण निर्माण होते.
पोलीस दल किंवा तपास यंत्रणा डिजिटल फूटप्रिंट्सचे विश्लेषण करून आणि मागील प्रकरणांचा संदर्भ देऊन पोस्टच्या तपासणीला सुरुवात करतात.
हेदेखील वाचा- पार्किंग आणि कार चोरीचं टेन्शन मिटलं, गुगल मॅपचं हे फीचर करणार तुम्हाला मदत
आयपी ॲड्रेस ट्रेस: आयडी ॲड्रेस ओळखून तपास यंत्रणा तपास सुरू करतात. त्याच्या मदतीने डिव्हाइसचे लोकेशन शोधले जाते. मात्र लोकेशन लपविण्यासाठी गुन्हेगार व्हीपीएन किंवा प्रॉक्सी वापरतात.
डिजिटल फॉरेन्सिक्स: तज्ञ पोस्टशी संबंधित मेटा डेटाचे विश्लेषण करतात, जसे की वेळ, डिव्हाइस आणि ब्राउझर इत्यादी तपशील मिळवणे.
सोशल प्लॅटफॉर्मवरून मदत: Facebook, X, आणि Instagram सारख्या प्लॅटफॉर्मने कायदेशीर विनंतीनुसार पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. पोलीस पोस्ट करण्यात आलेल्या नोंदणीकृत ईमेल, फोन नंबर आणि क्रियाकलाप लॉग यासारख्या तपशीलांची मागणी करू शकतात.
भाषा आणि टायपिंगची शैली: तपास यंत्रणा पोस्टची टायपिंग शैली, भाषा आणि वेळ यांचे विश्लेषण करते. हे मागील पोस्टशी जुळले आहे. बिष्णोई टोळीच्या प्रकरणांप्रमाणेच, जबाबदारी घेण्याच्या त्यांच्या दाव्याची एक खास शैली आहे.
बनावट किंवा हॅक केलेले अकाऊंट
तपासादरम्यान अनेक आव्हाने उभी राहतात. पोलिसांना खऱ्या अकाऊंटपर्यंत पोहोचण्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे बनावट किंवा हॅक केलेली खाती. यामध्ये गुन्हेगार नवीन अकाऊंट बनवतात, किंवा कुणाचे अकाउंट हॅक करतात. यानंतर, त्याचा वापर करून एक पोस्ट शेअर करतात.
चोरीचे डिव्हाईस वापरणे
अशा प्रकरणांमध्ये चोरीची डिव्हाईस इत्यादींचा वापर केला जातो. यानंतर खऱ्या आरोपींचा शोध घेणे कठीण होते.