Instagram चं भन्नाट फीचर! आता यूजर्सना मिळणार Comment एडीट करण्याचा पर्याय, इतकी असेल टाईम-लिमिट
इंस्टाग्रामने ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं आहे की, अनेकदा असं होतं की, तुम्ही तुमच्या किंवा दुसऱ्या एखाद्या इंस्टाग्राम यूजरच्या पोस्टवर कमेंट करताना काही चूका करता. यामुळे संपूर्ण कमेंट डिलीट करावी लागते आणि पुन्हा टाईप करावी लागते. मात्र आता असं होणार नाही. कारण आता इंस्टाग्राम त्यांच्या यूजर्ससाठी एक खास फीचर घेऊन आले आहे. या नवीन फीचरअंतर्गत आता यूजर्स त्यांनी शेअर केलेल्या कमेंट्स एडीट करू शकणार आहेत. त्यामुळे जरी काही चुकले असेल तरी संपूर्ण कमेंट डिलीट करण्याची गरज भासणार नाही. हे विशेषत: अशा कंटेट क्रिएटर्ससाठी फायद्याचे ठरणार आहे, जे त्यांच्या फॉलोवर्सच्या कमेंट्सना रिप्लाय करतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
मेटाच्या मालकीच्या सोशल मीडियी प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने सांगितलं आहे की, कमेंट केल्यानंतर 15 मिनिटांच्या कालावधीसाठी यूजर्सना एडीटचा पर्याय मिळणार आहे. 15 मिनिटे संपल्यानंतर यूजर्सना एडीट पर्याय मिळणार नाही. तसेच फोटोसह करण्यात आलेल्या कमेंटमध्ये यूजर्स केवळ टेक्स्ट एडिट करू शकणार आहेत. यूजर्स त्यांच्या कमेंट्स शेअर केल्यापासून 15 मिनिटांच्या आत हव्या तितक्या वेळा एडिट करू शकणार आहेत.
AI+ चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय! पावरफुल प्रोसेसर ऑफर करणार दमदार परफॉर्मंस, किंमत ठरली खास
इंस्टाग्रामने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कमेंट्स एडीट करणार, तिथे यूजर्सना एडीटेड लिहीलेले दिसणार आहे. जसे फेसबूक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसतं. मात्र यूजर्सना हिस्ट्री दिसणार नाही की, पहिल्यांदा काय कमेंट शेअर करण्यात आली होती. इंस्टाग्रामने सांगितलं आहे की, हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. सर्व यूजर्सना लवकरच हा पर्याय दिसणार आहे. जर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये हे फीचर नसेल, तर गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून ॲप अपडेट करा. ॲप अपडेट झाल्यावर, यूजर्सना हे फीचर मिळू लागेल.






