AI+ चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय! पावरफुल प्रोसेसर ऑफर करणार दमदार परफॉर्मंस, किंमत ठरली खास
Oppo A6s Pro ठरला गेमचेंजर! 5G सपोर्ट आणि 7000mAh बॅटरीसह केली दमदार एंट्री, असे आहेत कॅमेरा फीचर्स
भारतात AI+ Nova Flip 5G स्मार्टफोन 8GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला असून ज्याची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्लेशियर व्हाइट कलरमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. या हँडसेटची विक्री मे महिन्यात सुरु होणार आहे. मात्र अद्याप कंपनीने विक्रीची तारीख जाहीर केली नाही. (फोटो सौजन्य – X)
AI+ Nova Flip 5G मध्ये 6.9-इंच एमोलेड इनर डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2790 x 1188 पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz आणि पिक्सेल डेंसिटी 443ppi आहे. कंपनीचा नवा फ्लिप स्मार्टफोन1200 निट्सपर्यंत हाय ब्राइटनेस मोडला सपोर्ट करतो, DCI-P3 कलर गॅमटचा 100 टक्के भाग कव्हर करतो आणि 10-बिट कलर डेप्थ ऑफर करतो. हा पॅनल 2160Hz PWM डिमिंगला देखील सपोर्ट करतो. स्मार्टफोनच्या बाहेरील बाजूला 3.1-इंच एमोलेड कवर डिस्प्ले दिला आहे.
AI+ ने दावा केला आहे की, Nova Flip 5G स्मार्टफोन मीडियाटेक डेमेन्सिटी 7300X चिपसेटने सुसज्ज आहे. ज्यासोबत 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB uMCP 2.2 स्टोरेज दिले आहे. हा फोन अँड्रॉईड 15 वर आधारित आहे, ज्यावर NxtQ OS चा थर आहे. AI+ Nova Flip 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा दिला आहे, जो 10x पर्यंत डिजिटल झूमला सपोर्ट करतो आणि यासोबतच पोर्ट्रेट शॉट्ससाठी 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर देखील दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या क्लॅमशेल फोल्डेबल फोनचा होव्हर मोड, फोन किंचित दुमडलेल्या स्थितीत वापरला जात असतानाही स्पष्ट फोटो टिपतो. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
BGMI गेमर्ससाठी खुशखबर! लॉगिनसाठी आता पासवर्डची गरज नाही, WhatsApp करणार मदत
AI+ Nova Flip 5G मध्ये 4,325mAh बॅटरी दिली आहे, जी 33W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यामध्ये PD3.0 आणि PPS स्टँडर्ड देखील आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये डुअल 5G सिम सपोर्ट, ब्लूटूथ, एनएफसी, ओटीजी, एल1 आणि एल5 बँडसह जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे. यामध्ये असलेल्या सेंसरमध्ये हॉल सेंसर, जायरोस्कोप आणि सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर समाविष्ट आहे.






