कोणी किती वेळा पाहिली तुमची स्टोरी? सर्व काही समजणार एका क्लिकवर, इंस्टाग्रामचं नवं फीचर बदलणार यूजर्सचा अनुभव
सोशल मीडिया सल्लागार मॅट नॅव्हारा यांनी थ्रेड्सवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, इंस्टाग्राम प्लस हे स्नॅपचॅट प्लससारखेच असणार आहे. यामध्ये यूजर्सना काही खास फीचर्स ऑफर केले जाणार आहेत. सध्या या नवीन इंस्टाग्राम अपडेटची चाचणी फिलीपींसमध्ये केली जात आहे. या नव्या अपडेटसाठी म्हणजेच इंस्टाग्राम प्लससाठी यूजर्सना दर महिना PHP 65 म्हणजेच सुमारे 100 रुपये खर्च करावे लागणार आहेत. एक स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये सब्सक्रिप्शन आपोआप रिन्यू होण्यापूर्वी एका महीन्याचे फ्री ट्रायल देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
शेअर करण्यात आलेल्या ईमेजबाबत विचार केला तर असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, इंस्टाग्राम प्लस मुख्य स्वरुपात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या स्टोरीजवर फोकस करणार आहे. यूजर्स त्यांच्या स्टोरीज वेगवेगळ्या लोकांच्या ग्रुपसोबत शेअर करू शकणार आहेत. तसेच यूजर्स लक्ष ठेऊ शकणार आहेत की, त्यांची स्टोरी किती वेळा पुन्हा – पुन्हा पाहिली आहे. तसेच स्टोरिज पाहणाऱ्यांच्या यादीतून यूजर्स कोणालाही सर्च करू शकणार आहेत. यानंतर यूजर्स पाहू शकतात की, एखाद्या यूजरने त्यांची स्टोरी किती वेळा पाहिली आहे. स्टोरी शेअर करण्यापूर्वी प्रीव्यू देखील पाहू शकता.
Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर
असा दावा केला जात आहे की, इंस्टाग्राम काही देशांमध्ये या नवीन अपडेटची चाचणी करत आहे. नवीन अपडेट वापरणारे सर्व यूजर्स स्टोरीसाठी ऑडियंसची अनलिमिटेड लिस्ट तयार करू शकणार आहेत. तसेच स्टोरी पाहण्याचा कालावधी 24 तासांपेक्षा जास्त वाढवला जाऊ शकतो. हे नवीन अपडेट अशा यूजर्ससाठी फायद्याचे ठरणार आहे, ज्यांना सतत उत्सुकता असते की त्यांची स्टोरी पुन्हा कोणी पाहिली आहे. आता इंस्टाग्राम या नव्या अपडेटबाबत अधिकृतपणे कधी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






