50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
चीनमध्ये आयक्यूओओ 16 हा 12GB+256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,799 म्हणजेच सुमारे 97,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 1,07,000 रुपये आहे. तर या डिव्हाईसच्या 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 8,499 म्हणजेच सुमारे 1,21,000 रुपये आहे. ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये या स्मार्टफोनची विक्री विवोच्या ऑनलाईन स्टोअरवर सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन चेजिंग द लाइट, लीजेंड आणि रेसिंग ट्रॅक या रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: X)
आयक्यूओओ 16 एक डुअल-सिम स्मार्टफोन आहे, जो विवोच्या नव्या ओरिजीनओएस 7 वर चालतो, जो अँड्रॉईड 17 वर आधारित आहे. फोनमध्ये 6.85-इंच 2K (1,440 x 3,168 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो सॅमसंग एम16 ल्यूमिनसेंट मटीरियल, 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 508 पीपीआय पिक्सल डेंसिटी, 1.07 बिलियन कलर्स आणि 5,000Hz पर्यंत टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतो. यामध्ये एचबीएम मोडमध्ये 2,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, एआर एंटी-रिफ्लेक्टिव फिल्म आणि लीड डिस्प्ले टेक्नोलॉजी मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळणार आहे.
परफॉर्मंससाठी आयक्यूओओ 16 मध्ये क्वालकॉमचा 2nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम चिपसेट देण्यात आला आहे, जो 5.01GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड देतो. यासोबतच फोनमध्ये कंपनीने स्वत:चे Q4 गेमिंग चिप, अड्रेनो जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि 1TB पर्यंत जलद यूएफएस 4.1 स्टोरेज दिले आहे. फोन थंड ठेवण्यासाठी, यात 8,500 चौरस मिलीमीटर इतके उष्णता बाहेर टाकण्याचे क्षेत्रफळ असलेली मोठी ‘व्हेपर चेंबर’ कूलिंग सिस्टीम देण्यात आली आहे.
आयक्यूओओ 16 च्या रिअरमध्ये तीन 50-मेगापिक्सेलचे कॅमेरा मिळणार आहे. यामध्ये ओआयएस सपोर्ट आणि 1/1.3-इंच सेंसरवाला 50 मेगापिक्सेल (f/1.68) चा मुख्य कॅमेरा, 100x डिजिटल झूमवाला 50 मेगापिक्सेल (f/2.65) चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेल (f/2.05) चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा समाविष्ट आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल (f/2.2) चा कॅमेरा दिला आहे. हा फोन 8K/30fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
नव्या डिव्हाईसमध्ये 100W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,400mAh बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G एलटीई, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, बेईडौ, ग्लोनास आणि गॅलिलिओ सारखे पर्याय देण्यात आले आहेत. फोनमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेंसर, जायरोस्कोप आणि एंबियंट लाइट सेंसर सारखे काही महत्त्वाचे सेसंर्स देखील उपलब्ध आहेत.






