Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट... Vivo च्या 'या' स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
फ्लिपकार्ट सेलमध्ये विवो व्हि 70 एफई 5G स्मार्टफोनची किंमत 44,999 रुपये झाली आहे. खरं तर या स्मार्टफोनची किंमत 53,999 रुपये आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर थेट 17 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. याशिवाय बँक ऑफर्सद्वारे या डिव्हाईसची किंमत आणखी कमी होणार आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 6,525 रुपयांची सूट मिळणार आहे. दरम्यान, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेची क्रेडिट कार्ड्स तसेच गुगल पे युपीआय वापरून केलेल्या पेमेंटवर 4,500 रुपयांपर्यंतची सवलत उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: Vivo)
इतकंच नाही स्मार्टफोन खरेदी करताना जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास आणखी फायदा होणार आहे. जुना फोन बदलल्यास 39,050 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज मूल्य आणि 4,500 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज सवलतही दिली जात आहे. स्मार्टफोनची एक्सचेंज व्हॅल्यू डिव्हाईसच्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहे.
विवो व्हि 70 एफई 5G मध्ये 6.83-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. हा एक प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1,900 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. फोनमध्ये 4nm मीडियाटेक डायमेन्सिटी 7360-टर्बो प्रोसेसर मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर5 रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे.
Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स
फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच, डिव्हाईसमध्ये 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये 50MP चा आई एएफ सेल्फी कॅमेरा देखील मिळणार आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 90W फ्लॅशचार्ज टेक्नोलॉजी सपोर्टसह 7,000mAh बॅटरी मिळणार आहे.






