GPay मध्ये आले नवे 'पॉकेट मनी' फीचर! एकाच UPI ने संपूर्ण कुटूंब करू शकणार पेमेंट, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
NPCI ने गेल्यावर्षी यूपीआय सर्कल सर्विसची सुरुवात केली होती. यामध्ये एकच यूपीआय अकाऊंटचा वापर 5 सदस्य करू शकतात. गूगलचे पॉकेट मनी फीचर देखील यावर आधारित आहे. गुगल पे च्या नव्या फीचरमध्ये घरातील 5 सदस्य त्यांचे अकाऊंट लिंक करू शकणार आहेत. या नव्या फीचरची सर्वात खास गोष्ट म्हणजे ज्या सदस्यांकडे बँक अकाऊंट नाही, ते सदस्य देखील यूपीआय सर्विसचा वापर करू शकणार आहेत. उर्वरित सदस्य फक्त प्रायमरी मेंबरच्या बँक अकाऊंटमधून UPI पेमेंट वापरू शकतील. (फोटो सौजन्य – Pinterest)






