AI+ चा नवा धमाका! 6,000mAh बॅटरीसह लाँच केले स्वस्त 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Instagram चं भन्नाट फीचर! आता यूजर्सना मिळणार Comment एडीट करण्याचा पर्याय, इतकी असेल टाईम-लिमिट
AI+ Nova 2 5G स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीचा अद्याप खुलासा करण्यात आला नाही. या स्मार्टफोनची विक्री 14 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. सिरीजमधील AI+ Nova 2 Ultra 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच कंपनीने 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीचा खुलासा केला नाही. या डिव्हाईसची विक्री 17 एप्रिलपासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर AI+ Nova 2 5G आणि AI+ Nova 2 Ultra 5G मध्ये लेटेस्ट अँड्रॉईड 16 बेस्ड NxtQ OS दिला आहे. AI+ Nova 2 अल्ट्रा 5G मध्ये 6.78-इंच 1.5K एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 2,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. तसेच AI+ Nova 2 5G मध्ये 6.745-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये केवळ 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे.
अल्ट्रा मॉडेलमध्ये 4nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 चिपसेट दिला आहे, ज्यासोबत 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB की स्टोरेज दिले आहे. तसेच AI+ Nova 2 5G मध्ये ऑक्टा-कोर यूनिसोक T8200 चिपसेट दिला आहे. डिव्हाईस माली-जी57 एमपी2 जीपीयू, 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे.
कंपनीच्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. तर अल्ट्रा मॉडल 33W वायर्ड फास्ट चार्जिंग ऑफर करते. स्टँडर्ड व्हेरिअंटमध्ये 18W वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
फोटोग्राफीसाठी AI+ Nova 2 अल्ट्रा 5G मध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे, जिथे सोनी IMX752 सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनवाला 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. तसेच डिव्हाईसमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस देखील दिला आहे. AI+ Nova 2 5G मध्ये देखील 50-मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी दोन्ही डिव्हाईसमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाई-फाई 6, ब्लूटूथ 5.4 सपोर्ट दिला आहे.






