फ्लॅगशिप फोनच्या शर्यतीत Poco ची एंट्री! नव्या सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष, फीचर्स एकदा पाहाच
पोको एफ 9 अल्ट्राच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत $799 म्हणजेच सुमारे 76,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 16GB + 1TB या व्हेरिअंटची किंमत $949 म्हणजेच सुमारे 90,000 रुपये ठेवली आहे. डिव्हाईसच्या 16GB + 1TB या टॉप व्हेरिअंटची किंमत $1,199 म्हणजेच सुमारे 1,14,000 रुपये ठेवली आहे. पोको एफ 9 प्रोच्या 12GB + 256GB मॉडेलची किंमत $699 म्हणजेच सुमारे 66,000 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत $769 म्हणजेच सुमारे 73,000 रुपये झाली आहे. नवीन स्मार्टफोन्स शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. पोको एफ 9 अल्ट्रा ब्लॅक आणि डार्क चेरी कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर पोको एफ 9 प्रो ऑरोरा ग्रीन, ब्लॅक आणि व्हाइट कलर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य: Poco)
पोको एफ 9 अल्ट्रा आणि पोको एफ 9 प्रो डुअल-सिम स्मार्टफोन्स आहेत. जे शाओमीच्या अँड्रॉईड 16-आधारित हायपरओएस 3 वर चालतो. अल्ट्रा मॉडेलमध्ये 6.9-इंच फुल-एचडी+ (1,200 x 2,608 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले दिला आहे, जो 185Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 2,200 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, 480Hz टच सँपलिंग रेट, 100 परसेंट डीसीआय-पी3 कलर गॅमट, 68 बिलियन कलर्स, वेट टच डिस्प्ले 2.0 आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन दिले आहे. तर, दुसरीकडे पोको एफ 9 प्रोमध्ये 6.59-इंच (1,156 x 2,510 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये अल्ट्रा मॉडेलचे सर्व डिस्प्ले फीचर्स उपलब्ध आहेत.
पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी दोन्ही स्मार्टफोन्सना IP68 रेटिंग मिळाली आहे. पोको एफ 9 अल्ट्रा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेटने सुसज्ज आहे, जो 4.6GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. तर, पोको एफ 9 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 व्ही प्रोसेसर देण्यात आला आहे. जो समान पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये विजनबूस्ट डी8 चिपसेट, एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेज दिले आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, पोको एफ 9 सिरीजमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह 200-मेगापिक्सेल (f/1.68) चा प्रायमरी लेंस आणि 50-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. अल्ट्रा मॉडेलमध्ये 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे, तर प्रो मॉडेलमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेंस मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
पोको एफ 9 अल्ट्रामध्ये 8,050mAh बॅटरी दिली आहे. तर पोको एफ 9 प्रो मध्ये 6,330mAh बॅटरी दिली आहे. दोन्ही नव्या स्मार्टफोन्समध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोन्समध्ये वायर्ड आणि वायरलेस रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोन्समध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर मिळणार आहे.






