IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर
खरं तर हे चिपसेट्स सुरुवातीला सप्टेंबरमध्ये आयोजित क्वालकॉमच्या ‘स्नॅपड्रॅगन समिट’मध्ये सादर करण्यात आले होते. दोन्ही चिपसेट्स 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आले आहेत. या चिपसेट्समध्ये कंपनीचा कस्टम Oryon सीपीयू आर्किटेक्चर मिळणार आहे. क्वालकॉमने ऑन-डिव्हाईस आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय), गेमिंग, कॅमेरा प्रोसेसिंग आणि कनेक्टिविटीमध्ये काही सुधारणा हायलाईट केल्या आहेत. (फोटो सौजन्य: X)
क्वालकॉमने दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन प्लॅटफॉर्म्स जास्त ॲडव्हांस एआय अनुभवाला सपोर्ट करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत. यामध्ये असे एजेंट्स समाविष्ट आहेत, जे यूजरची पसंती समजू शकतात आणि जास्त पर्सनलाइजेशनसह काम पूर्ण करू शकतात. एक्सट्रिम व्हेरिअंट या श्रेणीतील सर्वोच्च स्थानावर आहे, तर ‘स्टँडर्ड जेन 6’ चा उद्देश अनेक प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये ‘फ्लॅगशिप’ दर्जाची वैशिष्ट्ये उपलब्ध करून देणे हा आहे.
भारतात आयोजित करण्यात आलेल्या या ईव्हेंटमध्ये मोटोरोला, आयक्यूओओ आणि शाओमीने स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 ने सुसज्ज असलेले आगामी स्मार्टफोन्स सादर केले आहेत. आयक्यूओओने या ईव्हेंटमध्ये आगामी फ्लॅगशिप आयक्यूओओ 16 सादर केलास जो एक्सट्रिम व्हेरिअंटवर काम करतो. कंपनीने संकेत दिले आहेत की, हा स्मार्टफोन लवरकच भारतात लाँच केला जाणार आहे.
प्रेजेंटेशनदरम्यान क्वालकॉमने सांगितलं की, स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चे प्रमुख सीपीयू कोअर्स 5GHz ची कमाल फ्रिक्वेन्सी गाठू शकतात. कंपनीने ओवरऑल सिस्टम-ऑन-चिप (SoC) पावर एफिशिएंसीमध्ये 10 टक्के सुधारणा झाल्याचा दावाही केला आहे. क्वालकॉमचं असं म्हणणं आहे की, हे चिपसेट 40 टक्के उत्तम जीपीयू पावर एफिशिएंसी आणि 37 टक्के उत्तम सीपीयू पावर एफिशिएंसी ऑफर करणार आहे. कंपनीने जीपीयू परफॉर्मेंसमध्ये 144 टक्के सुधारणा केल्याचा दावा देखील केला आहे. क्वालकॉमने म्हटलं आहे की, हे चिपसेट त्याच्या हेक्सागॉन एलिमेंट ॲक्सिलरेटरचा वापर करून 30 अब्जाहून अधिक पॅरामीटर्स असलेले मिक्सचर-ऑफ-एक्सपर्ट्स मॉडेल्स थेट डिव्हाईसवर चालवू शकतो.






