पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री
कंपनीच्या स्मार्ट होम हब, सेकेंड-जेनरेशन होमपॉड मिनी आणि नव्या ॲपल टिव्ही 4K सेट-टॉप बॉक्सबाबत सोशल मीडियावर गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहेत. कंपनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस देखील आणखी एका ईव्हेंटचे आयोजन करणार असल्याचे सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
Welcome home. October 13. https://t.co/ChelGSDOTI — Greg Joswiak (@gregjoz) October 8, 2026
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, ॲपलचे सीनियर वाइस प्रेसिडेंट ऑफ वर्ल्डवाइड मार्केटिंग Greg Joswiak यांनी घोषणा केली आहे की, क्यूपर्टिनो बेस्ड टेक कंपनी 13 ऑक्टोबर रोजी त्यांच्या वेलकम होम ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. टिझर व्हिडीओवरून असे संकेत मिळत आहेत की, कंपनी त्यांच्या ईव्हेंटदरम्यान सध्या चर्चेत असलेले होम डिव्हाईस लाँच करू शकते. याव्यतिरिक्त, यूट्यूबर आणि टेक रिव्यूअर मार्केस ब्राउनली (@MKBHD) यांनीही माध्यमांना पाठवल्या जाणाऱ्या ॲपलच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो शेअर केला आहे.
ॲपल वेलकम होम ईव्हेंट न्यूयॉर्कच्या ट्रायबेकामध्ये आयोजित केला जाणार आहे आणि भारतीय वेळेनुसार हा ईव्हेंट संध्याकाळी 6.30 वाजता (ईस्टर्न वेळ सकाळी 9 वाजता) सुरु होणार आहे. कंपनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलद्वारे या ईव्हेंटचे लाईव्हस्ट्रिम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ईव्हेंटदरम्यान कंपनीचे पहिले स्मार्ट होम हब, होमपॉड मिनी (2026) आणि ॲपल टिव्ही 4K (2026) लाँच केले जाण्याची शक्यता आहे.
ब्लूमबर्गद्वारे शेअर करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, ॲपल 27 ऑक्टोबर आणखी एका ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. खरं असं झालं तर हा कंपनीच्या या वर्षातील तिसरा ईव्हेंट असू शकतो. या ईव्हेंटमध्ये कंपनी ॲपलचा पहिला मॅकबुक मॉडेल, M6 चिपसेटवाला नवीन मॅकबुक प्रो, M6 चिप अपग्रेडवाला नेक्स्ट-जेनरेशन आयमॅक आणि नवीन आयपॅड मिनी मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. टचस्क्रीन वाले मॅकबुक बाजारात मॅकबुक अल्ट्रा या नावाने लाँच केले जाऊ शकते. कंपनीने अद्याप या गॅझेट्सचे कोणतेही डिटेल्स शेअर केले नाहीत.
स्मार्ट होम हबच्या लीक्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6-इंच किंवा 7-इंचाचा स्क्वेयर टचस्क्रीन डिस्प्ले मिळणार आहे, जो एका गोलाकार बेसला जोडलेला असू शकतो. या बेसमध्येच इन-बिल्ट स्पीकरची व्यवस्था असण्याचीही शक्यता आहे. हे स्मार्ट होम डिव्हाईस कथितपणे सिरी एआय क्षमता आणि ॲपलच्या ए18 चिपसेटसह लाँच होऊ शकते.






