UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल! १०,००० पेक्षा जास्त रकमेवर १ तासाचा ‘कूलिंग पीरियड’? RBI चा मोठा प्लॅन

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी आरबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. १०,००० रुपयांपेक्षा जास्त UPI आणि IMPS व्यवहारांवर 1 तासाचा ‘कूलिंग पीरियड’ लागू करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे.
UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल! १०,००० पेक्षा जास्त रकमेवर १ तासाचा ‘कूलिंग पीरियड’? RBI चा मोठा प्लॅन
UPI व्यवहारांमध्ये मोठा बदल! १०,००० पेक्षा जास्त रकमेवर १ तासाचा ‘कूलिंग पीरियड’? RBI चा मोठा प्लॅन
Published on: 
Updated on: 
  • 10,000 रुपयांवरील UPI/IMPS व्यवहारांवर 1 तासाचा होल्ड ठेवण्याचा प्रस्ताव, ज्यामुळे फ्रॉड असल्यास व्यवहार रद्द करता येईल.
  • 70 वर्षांवरील व्यक्तींना मोठ्या व्यवहारांसाठी ‘ट्रस्टेड पर्सन’ची परवानगी अनिवार्य करण्याची शक्यता.
  • ‘किल स्विच’ फीचरद्वारे सर्व डिजिटल पेमेंट सेवा एका क्लिकमध्ये बंद करण्याचा पर्याय देण्याचा विचार.

तुम्ही युपीआय किंवा आयएमपीएसद्वारे कोणालाही १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवत असाल, तर ती रक्कम संबंधितापर्यंत पोहोचण्यासाठी आता एक तास वाट पाहावी लागू शकते. देशात वाढणारी डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) हे मोठे पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. नवीन योजनेनुसार, १०,००० रुपयांवरील डिजिटल व्यवहारांवर १ तासाचा 'कुलिंग पिरीयड' लागू केला जाऊ शकतो. आरबीआयने या प्रस्तावावर ८ मे पर्यंत सूचना मागवल्या असून, त्यानंतर अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. दरम्यान, सध्या आपण यूपीआय व्यवहार करतो तेव्हा पैसे काही सेकंदात समोरच्या व्यक्तीला मिळतात. फसवणूक करणाऱ्या टोळ्या याच वेगाचा फायदा घेतात.

हे प्रयत्न का केले जात आहेत ?

या निर्णयामागील मुख्य कारण वाढता डिजिटल फसवणुकीचा दर आहे. आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये २५५१ कोटी रुपयांच्या फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली आणि २०२५ पर्यंत हा आकडा २२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. एकूण फसवणुकीपैकी ९८% व्यवहार हे १०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे असतात. यामुळे ऑनलाइन धमक्यांद्वारे होणारी फसवणूक देखील रोखली जाईल. (फोटो सौजन्य – Pinterest) 

किल स्विचवरही चर्चची शक्यता

  • १०,००० रुपयावरील व्यवहारांना १ तासासाठी 'होल्ड'वर ठेवले जाईल, या काळात ग्राहकाला समजले की हा फ्रॉड आहे, तर तो व्यवहार रद्द करू शकेल.
  • ७० वर्षांवरील व्यक्तींनी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर केल्यास, त्याच्या 'ट्रस्टेड पर्सन' म्हणजेच विश्वासू व्यक्तीची परवानगी अनिवार्य असेल.
  • वैयक्तिक किवा छोट्या व्यावसायिक खात्यांमध्ये २५ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्यास, बँक खात्री केल्याशिवाय ती क्रेडिट करणार नाही.
  • आरबीआय 'किल स्विच सुविधेचा विचार करत आहे. या एका बटणाद्वारे ग्राहक आपले सर्व डिजिटल पेमेंट चैनल्स (यूपीआय, इंटरनेट बँकिंग, कार्ड्स) एकाच वेळी बंद करू शकेल.

अनेकांची गैरसोय होऊ शकते

तज्ज्ञांनुसार या निर्णयाचे काही तोटेही आहेत. तातडीच्या कामांसाठी (उदा. मेडिकल इमर्जन्सी किंवा तातडीची खरेदी) १०,००० रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करताना १ तास वाट पाहावी लागेल, ज्यामुळे काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते. याशिवाय प्रवासासाठी अचानक तिकीट बुक करायचे असेल आणि ती रक्कम १०,००० रुपयांच्या वर असेल, तर १ तास वाट पाहणे जीवावर बेतू शकते. अशा वेळी वेळेवर पैसे न पोहोचल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.