फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
Vivo चा भारतात नवा धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोनने केली तुफानी एंट्री, किंमत केवळ इतकी
कंपनीने त्यांचे नवीन स्मार्टफोन मॉडेल 4GB + 64GB या रिंग रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे. याची किंमत 14,999 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन realme.com वरून खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन लवकरच इतर ऑनलाईन रिटेलर्स आणि निवडक ऑफलाईन स्टोअर्सवर देखील खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. हे नवीन डिव्हाईस स्काईलाइन सिल्वर आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य: Realme)
नवीन डिव्हाईसच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6.8-इंच (720×1570 पिक्सेल) एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 700 निट्स (typ) / 900 निट्स (HBM) पर्यंत ब्राइटनेस देण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये Panda@MN228 ग्लास प्रोटेक्शन देखील मिळणार आहे. डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये 1.8 GHz ऑक्टा-कोर युनिसाॅक T7250 12nm प्रोसेसर, माली-जी57 एमपी1 जीपीयू मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम, 64GB यूएफएस 2.2 स्टोरेज आणि माइक्रो-एसडी कार्डद्वारे मेमोरी 2TB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये f/2.0 अपर्चरवाला 8MP रियर कॅमेरा मिळणार आहे, ज्यासोबत एलईडी फ्लॅश मिळणार आहे. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.2 अपर्चरवाला 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि 3.5mm ऑडियो जॅक, अल्ट्रा-लीनियर बॉटम-पोर्टेड स्पीकर देखील मिळणार आहे.
धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा मिळावी यासाठी फोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये मिलिट्री-ग्रेड मजबूती (MIL-STD-810H) डुअल 4G VoLTE, वायफाय 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लुटूथ 5.2, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, QZSS, यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग आणि रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी दिली आहे.






