अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर Samsung ची धमाकेदार ऑफर! स्मार्ट होम अप्लायन्सेसवर मिळणार कॅशबॅक आणि बंपर डिस्काऊंट
लाँच होताच गायब झाला Nothing चा Warp अॅप! यूजर्सना बसला धक्का, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
सॅमसंगचा हा सेल ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. कारण असं मानलं जातं की अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त अतिशय शूभ असतो. या मुहूर्तावर सहसा नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. अशातच आता सॅमसंगने नवीन सेलची घोषणा केल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. बीस्पोक एआय अप्लायन्सेसच्या खरेदीवर ग्राहकांना विशेष फायदे मिळणार आहेत. रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्ह सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सुमारे २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर केले जाणार आहे. तसेच ग्राहकांना एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि सॅमसंग केअर+ अंतर्गत ५ वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील मिळणार असल्याचे सांगितलं जात आहे. ग्राहकांना आनंद मिळावा, अनावश्यक खर्च कमी व्हावा आणि खरेदीचा अनुभव अधिक चांगला व्हावा या उद्देशाने सॅमसंग हा सेल घेऊन आला आहे.
सॅमसंगद्वारे आयोजित करण्यात आलेला हा सेल ३१ मे २०२६ पर्यंत सॅमसंगडॉटकॉम, आघाडीचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि भारतातील निवडक रिटेल आउटलेट्समध्ये उपलब्ध असणार आहे. सॅमसंगचे बीस्पोक एआय अप्लायन्सेस स्मार्ट, सर्वोत्तम आणि ऊर्जा-कार्यक्षम अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत. वैयक्तिक गरजांनुसार कूलिंग करण्यापासून कनेक्टेड होम मॅनेजमेंटपर्यंत या अप्लायन्सेसमध्ये प्रगत एआय आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे. विश्वासार्हता वाढवण्यासाठी, सॅमसंगच्या २०२६ बीस्पोक एआय एअर कंडिशनर श्रेणीमध्ये स्मार्टथिंग्स होम केअर एकीकृत करण्यात आले आहे. हे एक प्रो-अॅक्टिव्ह मॉनिटरिंग आणि प्रतिबंधात्मक देखभाल सोल्यूशन आहे, जे अप्लायन्सच्या कामगिरीचा सतत मागोवा घेते, गॅस गळती किंवा फिल्टर साफ करण्याची गरज यांसारख्या संभाव्य समस्या शोधते आणि वापरकर्त्यांना अलर्ट करते.
पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?
एआय व्हिजन इनसाइड तंत्रज्ञान असलेले बीस्पोक एआय रेफ्रिजरेटर्स फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू ओळखून आणि कनेक्टेड इकोसिस्टमशी विनासायासपणे एकीकृत होऊन किचनमधील अन्न व्यवस्थापन अधिक स्मार्ट करतात. सॅमसंगच्या बीस्पोक एआय वॉशिंग मशिन्समध्ये एआय वॉश वैशिष्ट्य आहे, जे कपड्यांचे वजन व कापडाचा प्रकार स्मार्टपणे ओळखून पाणी, डिटर्जंटचा वापर आणि वॉश सायकल्सचे अचूक नियोजन करते, ज्यामुळे कपडे उत्तमरित्या स्वच्छ धुतले जातात. हे अप्लायन्सेस सॅमसंगच्या स्मार्टथिंग्स फॅमिली केअर विशेष वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत.मनःशांती मिळण्यास मदत होते.






