

तुम्ही नवीन फोल्ड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. टेक कंपनी सॅमसंग त्यांच्या नव्या फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत असून हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, येत्या काही दिवसांतच बहुप्रतिक्षित गॅलेक्सी अनफॅक्ड ईव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे. कंपनीच्या या आगामी ईव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold 8 सादर केला जाणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीचा आगामी ईव्हेंट जुलै 2026 मध्ये आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी अनेक खास गॅझेट्स सादर करण्याची देखील शक्यता आहे.
नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की, 22 जुलै 2026 रोजी लंडनमध्ये कंपनी एका मोठ्या ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे आगामी फोल्डेबल डिव्हाईस सादर करण्याची शक्यता आहे. यामुळे आता सर्व टेकप्रेमींच्या नजरा आगामी ईव्हेंटकडे लागल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
यावेळी कंपनीच्या स्मनार्टफोनच्या डिझाईनमध्ये केला जाणार आहे. रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की, सॅमसंग Galaxy Z Fold 8 सह एक नवीन Wide फोल्डेबल फोन देखील लाँच करणार आहे. यापूर्वी कंपनी मोठ्या स्क्रीन रेशियोसह फोल्ड डिव्हाईस लाँच करण्यावर भर देत होती. मात्र आता आगामी फोल्ड मॉडेलमध्ये अतिरिक्त विस्तृत लेआउट ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे यूजर्सना टॅब्लेटसारखा अधिक चांगला व्ह्यु आणि मल्टीटास्किंग एक्सपीरियंस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्ट्सवरून असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे की, या नव्या फोल्डेबल फोनमध्ये 7.6-इंच इनर डिस्प्ले दिल जाणार आहे. तसेच यामध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर देखील दिला जाऊ शकतो.
रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, सॅमसंग त्यांच्या फोल्डेबल लाइनअपमध्ये S Pen चा पुन्हा एकदा समावेश करणार आहे. जे यूजर्स प्रोडक्टिविटी आणि नोट-टेकिंगला प्राधान्य देतात, अशा यूजर्ससाठी हे फीचर अतिशय फायद्याचं ठरणार आहे.
शेअर करण्यात आलेल्या रिपोर्ट्समध्ये सॅमसंगच्या Galaxy Z Flip 8 चा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. सॅमसंग सहसा आपल्या 'अनपॅक्ड' इव्हेंटमध्ये फोल्ड आणि फ्लिप दोन्ही डिव्हाईस लाँच करते, परंतु यावेळी फोल्ड आणि नवीन वाइड मॉडेलवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.