OnePlus घेऊन येतोय 'Ultra' मॉडेल! टीजर पाहून टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? जाणून घ्या
कंपनीच्या आगामी स्मार्टफोनबाबत यूजर्सची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. आगामी स्मार्टफोनचा टिझर कंपनीच्या एका एग्जीक्यूटिवने शेअर केला आहे. या टिझरमध्ये कंपनीच्या आगामी स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती दिली नसली तरी कथित वनप्लस एस 6 अल्ट्रा अलीकडेच देशातील एका प्रमाणन डेटाबेसवर आढळून आला आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीचा आगामी स्मार्टफोन मीडियाटेक डेमेन्सिटी 9000 चिपसेटवर आधारित असणार आहे.
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये वनप्लस चाईनाचे प्रेसिडेंट ली जी लुईस यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक नवीन वनप्लस Ace सीरीज स्मार्टफोन लाँच करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच हा टिझर वनप्लसच्या अधिकृत Weibo पेजवर देखील अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये लिहीले आहे की, वनप्लसच्या Ace नवीन प्रोडक्ट्सचा महिना अधिकृतपणे सुरू झाला आहे. यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, Ace सीरीजचा हा अपकमिंग स्मार्टफोन या महिन्याच्या अखेरपर्यंत चीनमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – X)
मात्र टेक कंपनीने अद्याप या नव्या स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. तसेच आगामी स्मार्टफोनचे नाव, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स किंवा लाँच डेट कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. त्यामुळे आता अशी आशा व्यक्त केली जात आहे की, येणाऱ्या काही आठवड्यांत हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. तसेच कंपनी स्मार्टफोनबाबत सर्व डिटेल्स देखील जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका अहवालानुसार, अलीकडील अहवाल, लीक आणि अफवांच्या आधारे, हा टीझर वनप्लस एस 6 अल्ट्राशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.
Ai+ चा नवा धमाका! 6,000mAh बॅटरीसह लाँच केले स्वस्त 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये कथित OnePlus Ace 6 Ultra चीनच्या MIIT सर्टिफिकेशन डेटाबेसवर स्पॉट करण्यात आला होता. यामुळे असे संकेत मिळत आहेत की, हा फोन एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, OnePlus Ace 6 Ultra मध्ये फ्लॅगशिप ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 चिपसेट असण्याची शक्यता आहे. यामध्ये एक प्लॅट डिस्प्ले असू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz पर्यंत असू शकतो. आगामी स्मार्टफोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.






