स्मार्टफोन खरेदीचा बजेट बिघडणार! Vivo T5x आणि iQOO Z11x च्या किंमती वाढल्या, आता मोजावे लागणार इतके पैसे
फ्लॅगशिप फोनच्या शर्यतीत Poco ची एंट्री! नव्या सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष, फीचर्स एकदा पाहाच
विवोच्या अधिकृत वेबसाईटवर आता विवो टी 5 एक्स 5जी च्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये झाली आहे. या डिव्हाईसच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये झाली आहे. हे स्मार्टफोन्स साइबर ग्रीन, फ्यूजन रेड आणि स्टार सिल्वर कलर ऑप्शन्समध्ये खेरदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
विवोने हा फोन मार्च महिन्यात भारतात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी, या डिव्हाईसच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली होती. तर 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली होती. यानंतर, कंपनीने या डिव्हाईसच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंंमत 24,999 रुपये, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंंमत 27,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंंमत 30,999 रुपयांपर्यंत वाढवली होती. मात्र आता पुन्हा एकदा कंपनीने या व्हेरिअंटच्या किंमती वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
विवो टी 5 एक्स 5 जी अँड्रॉईड 16 वर बेस्ड ओरिजिनओएस 6 वर चालतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्सच्या पीक ब्राइटनेससह 6.76-इंच की फुल-एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 टर्बो प्रोसेसर, 50-मेगापिक्सेल सोनी IMX852 मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सेल बोकेह कॅमेरा आणि 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी दिली आहे. यासोबतच या फोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 आणि IP69 रेटिंग दिली आहे.
आयक्यूओओ झेड 11 एक्स 5 जी च्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 24,999 रुपये झाली आहे. 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये झाली आहे. हा स्मार्टफोन प्रिज्मॅटिक ग्रीन आणि टाइटन ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. मार्चमध्ये लाँचिंगवेळी, आयक्यूओओ झेड 11 एक्स 5जी च्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत 18,999 रुपये होती, 8GB + 128GB मॉडेलची किंमत 20,999 रुपये होती आणि 8GB + 256GB मॉडेलची किंमत 22,999 रुपये होती. लाँचिंगनंतर कंपनीने या स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत देखील अनेकदा बदल केला असल्याचे सांगितलं जात आहे.
आयक्यूओओ झेड 11 एक्स 5 जी मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्स पीक ब्राइटनेस वाली 6.76-इंच फुल-एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. या स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 वर चालतो. कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 टर्बो चिपसेट देण्यात आला आहे. बॅकअपसाठी या डिव्हाईसमध्ये 44W चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी दिली आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्राइमरी लेंस, 2-मेगापिक्सल बोकेह सेंसर आणि 32-मेगापिक्सेलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे. हा फोन IP68 आणि IP69+ रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.






