Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स
काही प्रोडक्ट्सवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. सॅमसंग वीक 2026 च्या ऑफर्स कंपनीची वेबसाईट, सॅमसंग शॉप ॲप आणि सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्सवर उपलब्ध आहेत. एकाच सेलमध्ये सॅमसंगचे विविध प्रोडक्ट्स खरेदी करण्याऱ्या लोकांसाठी ऑफर्स कॅटेगरीच्या हिशोबाने मांडण्यात आल्या आहेत. चला तर मग सेलमधील ऑफर्सबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
सॅमसंग वीक सेल 2026 मध्ये स्मार्टफोन्सवर 34 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. काही स्मार्टफोन्सवर 10 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट आणि मल्टी-बायवर 9,500 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. कंपनी 55 टक्क्यांपर्यंतचा खात्रीशीर बायबॅक आणि सॅमसंग केअर प्लस पर्याय देखील ऑफर करत आहे. पहिल्या खरेदीवर 4 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. या ऑफरमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा, झेड फोल्ड 8, झेड फ्लिप 8, एस26 अल्ट्रा, एस26, ए57 5G, ए37 5G, ए56 5G, ए36 5G, ए27 5G, एम17 5G आणि एम17e 5G सारख्या मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे.
सेलमध्ये टॅब्लेट्स, वियरेबल्स आणि ॲक्सेसरीजवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर करण्यात आलं आहे. तसेच काही प्रोडक्ट्सवर 6,500 रुपयांपर्यंतचे बँक डिस्काऊंट आणि पहिल्या खरेदीवर 2 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. गॅलेक्सी टॅब एस12 अल्ट्रा, टॅब एस12+, टॅब एस11 सिरीज, टॅब ए11 सिरीज, टॅब एस10 लाइट, बड्स 4, बड्स 4 प्रो, वॉच 8, वॉच अल्ट्रा 2, वॉच 9 सिरीज आणि बड्स कोअर या ऑफरचा भाग आहेत.
लॅपटॉप कॅटेगरीमध्ये 31 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. यासोबतच, 5 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट आणि पहिल्या खरेदीवर 2 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकणार आहे. तसेच प्रोडक्ट्सवर 5,000 रुपयांपर्यंतचे बँक डिस्काऊंट आणि पहिल्या खरेदीवर 2 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. टिव्हीवर 51 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच, काही मॉडेल्ससोबत फ्री साऊंडबर देखील मिळू शकतो.






