Vivo X500 सीरिज भारतात दाखल! 200MP कॅमेरा, 7800mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्ले बदलणार यूजर्सचा अनुभव; जाणून घ्या किंमत

Vivo X500 Launched: भारतात तीन नवीन विवो स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. दमदार कॅमेरा, पावरफुल बॅटरी आणि तगड्या फीचर्सने सुसज्ज असलेले हे स्मार्टफोन्स यूजर्सना भूरळ घालण्यासाठी सज्ज आहेत.
Vivo X500 सीरिज भारतात दाखल! 200MP कॅमेरा, 7800mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्ले बदलणार यूजर्सचा अनुभव; जाणून घ्या किंमत
Vivo X500 सीरिज भारतात दाखल! 200MP कॅमेरा, 7800mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्ले बदलणार यूजर्सचा अनुभव; जाणून घ्या किंमत
Published on: 
Updated on: 
  • नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज लाँच

  • नव्या स्मार्टफोन्समध्ये दमदार प्रोसेसर आणि हाई रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळणार

  • स्मार्टफोन्ससोबत फोटोग्राफी एक्सेसरीज देखील मिळणार

Vivo Smartphone Launched: भारतीय स्मार्टफोन बाजारात विवोने त्यांची नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. नव्या Vivo X500 सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. ज्यामध्ये Vivo X500, Vivo X500 Pro आणि Vivo X500 Pro Max मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोन्समध्ये दमदार प्रोसेसर आणि हाई रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळणार आहे. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोन्सची विक्री 3 डिसेंबरपासून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि विवो वेबसाईटवर सुरु होणार आहे.

Vivo X500 सीरिज भारतात दाखल! 200MP कॅमेरा, 7800mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्ले बदलणार यूजर्सचा अनुभव; जाणून घ्या किंमत
Huawei Mate X8 पाहिलात का? मोठी स्क्रीन आणि कॅमेरा पाहून सर्वच झाले चकित... लवकरच बदलू शकतो फोटोग्राफीचा अनुभव

विवो एक्स500 सीरीजची किंमत

विवो एक्स500 स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1,19,999 रुपये आहे. तर Vivo X500 Pro च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 1,49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर विवो एक्स500 प्रो मॅक्स च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 1,64,999 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 1,79,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Vivo)

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोन्ससोबत फोटोग्राफी एक्सेसरीज देखील मिळणार आहे. 200mm झाइस टेलिफोटो एक्सटेन्डर जेन 2 लेंसची किंमत 15,999 रुपये आणि 400mm लेंसची किंमत 27,999 रुपये आहे. तर व्हिवो इमेजिंग किट ची किंमत 11,999 रुपये आहे.

डिव्हाईसच्या खरेदीवर बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. तसेच एसबीआय, एचडीएफसी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि येस बँक च्या कार्डने खरेदी केल्यास 10 टक्के इंस्टंट कॅशबॅक मिळणार आहे. सिरीजमधील विवो एक्स500 मॉडेल एम्बर रेड आणि टायटॅनियम ब्लॅक रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर प्रो आणि प्रो मॅक्स मॉडल ॲपेक्स ऑरेंज आणि इटरनल ब्लॅक रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

विवो एक्स500 सीरीज चे स्पेसिफिकेशन्स

विवो एक्स500 प्रो मॅक्स मध्ये 6.85 इंच 2K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. तर सिरीजमधील विवो एक्स500 प्रो मध्ये 6.36 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे.

सिरीजमधील प्रो आणि मॅक्स मॉडेलमध्ये 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रो प्रोसेसर मिळणार आहे. यासोबतच दोन्ही डिव्हाईसमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 50MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील मिळणार आहे. तर प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 200MP झाइस एपीओ टेलीफोटो कॅमेरा देखील आहे. सिरीजमधील प्रो मॉडेलमध्ये 64MP चा टेलीफोटो कॅमेरा मिळणार आहे. स्मार्टफोन्सच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50MP चा कॅमेरा मिळणार आहे.

Vivo X500 सीरिज भारतात दाखल! 200MP कॅमेरा, 7800mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्ले बदलणार यूजर्सचा अनुभव; जाणून घ्या किंमत
भारतीय बाजारात Motorola चा नवा डाव; 144Hz डिस्प्लेसह जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून व्हाल थक्क

विवो एक्स500 चे स्पेसिफिकेशन्स

विवो एक्स500 मध्ये 6.59 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले दिला आहे, ज्यासोबत 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9600M प्रोसेसर मिळणार आहे. फोनमध्ये 50MP प्रायमरी, 50MP अल्ट्रावाइड आणि 64MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 50MP चा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. विवो एक्स500 मध्ये 7,500mAh बॅटरी मिळणार आहे. तर विवो एक्स500 प्रो मध्ये 6,510mAh बॅटरी आणि प्रो मॅक्समध्ये 7,800mAh बॅटरी दिली आहे. तिन्ही डिव्हाईसमध्ये 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.