फेक कॉल्सना बसणार आळा! अनोळखी कॉल उचलण्यापूर्वीच समजणार कॉलिंगच कारण, WhatsApp चं नवं फीचर नेमकं आहे तरी काय?
यूजर्स, यानंतर ट्रांसक्रिप्ट देखील वाचू शकणार आहेत आणि निर्णय घेऊ शकतील की कॉल रिसीव्ह करणं गरजेचं आहे की नाही. अलीकडेच समोर आलेल्या काही रिपोर्ट्नुसार, हे फीचर सध्या अँड्रॉईड ॲपमध्ये डेव्हलप केले जात आहे. आगामी फीचर व्हॉट्सॲपच्या कॉल फिल्टरिंग सिस्टिमचा एक भाग बनू शकते. अद्याप हे फीचर बीटा टेस्टर्ससाठी देखील उपलब्ध करण्यात आले नाही. तसेच कंपनीने या फीचरची रिलीज डेट देखील अद्याप घोषित केली नाही. (फोटो सौजन्य: Pinterest)
समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं आहे की, व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये कॉल फिल्टरिंग मेन्यू एका नव्या पर्यायासह बदलला जाऊ शकतो. यामध्ये यूजर्सना तीन पर्याय मिळू शकतात. ज्यामध्ये नेव्हर, सायलेंस आणि आस्क फॉर कॉलिंग असे तीन पर्याय असणार आहेत.
हा पर्याय निवडल्यानंतर कॉल फिल्टरिंग पूर्णपणे बंद राहणार आहे आणि सर्व कॉल्स सामान्य पद्धतीने येतील.
हा पर्याय निवडल्यास अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलची रिंगटोन बंद असणार आहे. मात्र कॉलचे डिटेल्स कॉल्स टॅब आणि नोटिफिकेशनमध्ये दिसणार आहे.
हा पर्याय निवडल्यानंतर व्हॉट्सॲप अनोळखी नंबरवरून कॉल करणाऱ्या व्यक्तिला कॉलिंगचं कारण विचारणार आहे. एकदा त्यांना प्रतिसाद मिळाल्यावर, यूजर तो कॉल स्वीकारायचा की नाकारायचा, हे ठरवू शकतील.
इतकंच नाही या फीचरमध्ये कॉल करणाऱ्या उत्तराचे टेक्स्ट ट्रांसक्रिप्ट देखील दिसणार आहे. यामुळे यूजर्सना, फोन न उचलताच, आलेला कॉल एखाद्या महत्त्वाच्या विषयासाठी आहे की नाही, हे ठरवता येईल.
Ans: व्हॉट्सॲप एका नवीन कॉल फिल्टरिंग फीचरवर काम करत आहे. या फीचरद्वारे अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास कॉल करणाऱ्या व्यक्तीला फोन करण्याचे कारण विचारले जाऊ शकते.
Ans: अनोळखी नंबरवरून वारंवार कॉल येणाऱ्या आणि स्पॅम किंवा संशयास्पद कॉल्सपासून सावध राहू इच्छिणाऱ्या यूजर्सना या फीचरचा फायदा होऊ शकतो.
Ans: या फीचरमध्ये नेव्हर, सायलेंस आणि आस्क फॉर कॉलिंग असे तीन पर्याय मिळण्याची शक्यता आहे.






