देशाचे एकूण उत्पादन ५३ दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे, परंतु बी ५० धोरणाच्या अंमलबजावणीमुळे, १६.३ दशलक्ष ते १७दशलक्ष टन पाम तेल केवळ बायोडिझेलसाठी देशांतर्गत वापरले जाईल.
आगामी सणासुदीच्या महिन्यांत देशभरात पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणे हे खाद्यतेल उद्योगाचे तत्काळ प्राधान्य आहे. मागणीच्या गतिशीलतेच्या दृष्टीने सुधारित शुल्क रचना देखील महत्त्वाची आहे.
. गेल्या आठवड्याच्या तुलनेत खाद्यतेलाच्या किमती १५ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढल्या आहेत. तेलाच्या किमतीतील या वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचा मासिक स्वयंपाकाचा खर्च वाढला आहे.