सिंधुदुर्ग मालवणमधील (Sindhudurg Malvan) आंगणेवाडी हे भराडी देवी (Anganewadi Bharadi Devi) मंदिरासाठी आणि दरवर्षी भरणाऱ्या आंगणेवाडी जत्रा (Jatra) सर्वात लोकप्रिय जत्रेसाठी अधिक प्रसिद्ध आहे. या जत्रेची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याची बदलणारी तारीख ही दरवर्षी फेब्रुवारीमध्ये परस्पर संमतीने निश्चित केली जाते. मालवण जिल्ह्यातील या गावात देवतेचे दर्शन घडल्याच्या अनेक आख्यायिका आहेत.
या जत्रेविषयी माहिती देण्यासाठी एका रिपोर्टरने व्हिडिओ केला आहे. त्याचं नाव कळू शकलेलं नाही. पण हा व्हिडिओ करत असताना त्याला ज्या अडचणींचा सामना करावा लागला. त्या परिस्थितीतही त्याने आपला संयम ढळू न देता व्हिडिओ पूर्णही केला. ही व्यक्ती इतकी प्रसिद्ध झाली की, जणूकाही त्याला भराडी देवीनेच भरभरून आशीर्वाद दिले असावेत म्हणून तो ‘कोकणचा चाँद नवाब’ नावारूपास आला.
[read_also content=”मुलीची हत्या, बाथरुममध्ये मृतदेह आणि रक्तरंजित कारस्थान… ७२ तासांत अशी उघड झाली मर्डर मिस्ट्री https://www.navarashtra.com/crime/up-meerut-crime-news-preeti-singh-murder-case-murder-mystery-72-hours-revelation-murderer-father-arrest-motive-bloody-conspiracy-police-nrvb-367565.html”]
व्हिडिओ शूट करताना त्याला इतके अडथळे आले की, शूट सुरू असताना लोकं त्याच्या समोर येऊन त्याच्याकडे पाहात रहायचे किंवा कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये डोकावत राहायचे. एकाला तर त्याने चांगलाच चोप दिला असल्याचंही पाहायला मिळतं आहे.
[read_also content=”जित्याची खोड! दहशतवाद्यांची भरती, हैदराबादमध्ये हल्ल्याची तयारी… लष्कराने भयानक कट उधळून लावला https://www.navarashtra.com/crime/shocking-crime-truth-pakistan-was-planning-to-terrorists-attack-on-hyderabad-india-nrvb-367569.html”]
व्हिडिओत शेवटी कुणीतरी त्याला म्हणतं की, देवीच्या दर्शनासाठी व्हीआयपी पास देत आहेत म्हणून. समोरच्याचं ते म्हणणं ऐकून हा कुडाळचा चाँद नवाब लगेचच तेथून धूम ठोकतानाही दिसतो आहे.