(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये दुकानबाहेर दोन मित्र हसत-खेळत काही मस्ती करताना दिसतात. मित्र आपल्या दुसऱ्या मित्र्याला खांद्यावर बसवून हसत असतो. ते रस्त्यात उभे असल्याने आजूबाजूच्या लोकांना जाण्यासाठी मित्र मागे फिरतो पण यावेळीच अनर्थ घडतो. दोघांच्या मागे एक हलकीशी ग्रील असते ज्याची माहिती मित्राला नसते. तिथे बसण्याची जागा असावी या भावनेने तो खांद्यावर घेतलेल्या मित्राला घेऊन पाठी सरकतो आणि त्या ग्रीलवर बसण्याच्या प्रयत्न करतो. इथेच त्याची मोठी घोडचूक ठरते कारण ग्रील लहान असल्याकारणाने ते बसायला जाताच त्यावरुन घसरुन जोरात खाली पडतात. त्यांची किंकाळी इतकी जबरदस्त असते की ऐकून दुकानातील लोक देखील बाहेर येतात. दोघांना या घटनेत गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे. दरम्यान ही घटना नक्की कुठली आहे याची मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
They would have never Expected that😭💀
(Wait for the end) pic.twitter.com/G4NGqQVKPv — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 15, 2026
सदर घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘त्यांनी याची कधीच अपेक्षा केली नसावी’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने लिहिले की, “आपण सुद्धा नेहमीच अशा प्रकारचा ‘बालिशपणा’ करत असतो; देव आपल्या सर्वांचे नेहमीच रक्षण करो.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते जिवंत आहेत की मृत? अरे बापरे, ते दृश्य खूपच भयानक दिसत होतं.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अति मजा करणे देखील चांगले नसते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






