(फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
सोशल मीडियावर दररोज अनेक धक्कादायक व्हिडिओ पाहिले आणि शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ असे इतके थरारक असतात की ते पाहून अनेकदा लोकांचा थरकाप होऊ लागतो. इथे बऱ्याचदा काही अपघातांचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की अनेक वेळा इतरांच्या चुकांमुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. रस्ते अपघातात बहुतेक वेळा दोष दुसऱ्याचा असतो. मात्र, असे अपघात रेल्वेमधेही बऱ्याचदा पाहायला मिळतात. सध्या असाच एक रेल्वे अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर याआधीही अपघातांचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. लोक आपल्या शुल्लक चुकीमुळे स्वतःला आणि इतरांचा जीव धोक्यात टाकतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून येत आहे. मात्र यात कोणा माणसाचा नाही तर बकरीच्या अपघाताचे दृश्ये दिसून आले आहे. विज्ञान कितीही प्रगत झालं असलं तरी प्राण्यांचा याबाबत काहीच ठाऊक नाही ज्यामुळे बऱ्याचदा रास्ता किंवा रेल्वे ओलांडताना त्यांच्यासोबात अपघाताच्या घटना घडून येतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचे दिसून आलेव आहे. बकरी रेल्वे ट्रॅकच्या मधोमध उभी असते जे पाहून एक तरुणी तिला वाचवण्यासाठी जीवाचा आकांत करून पळते मात्र तितक्यात समोरून ट्रेन येते आणि शेवटी नको तेच घडून बसते.
बापरे! आयुष्याला कंटाळला कामगार, इमारतीच्या 13 मजल्यावरून मारली उडी; थरकाप उडवणारा Video Viral
काय घडते व्हिडिओत?
व्हायरल व्हिडीओमध्ये बकरी रुळावर जाताना दिसत आहे. त्याच्या गल्लीत दोरी बांधलेली आहे. समोरून एक ट्रेन येते. ती हॉर्न वाजवते. हे पाहून एक मुलगी बकरीला वाचवण्यासाठी धावते. ती रुळावर उडी मारते आणि बकरीला ओढण्यासाठी दोरी पकडते. पण त्यामुळे शेळीला पलीकडे जाता येत नाही. यानंतर आपला जीवही धोक्यात असल्याचे पाहून तरुणी लगेच दुसऱ्या ट्रॅकवर झेप घेते ज्यामुळे तिचा जीव वाचतो मात्र यावेळी तिने हातात पकडलेल्या दोरीमुळे बकरीला पुढे सरकता येत नाही आणि परिणामी ट्रेन बकरीला धडकते. यानंतर ती बकरी ट्रेनसह पुढे ओढली जाते आणि यात तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. याबाबत लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी मुलीच्या धाडसाचे कौतुक केले तर काहींनी बकरीला मारण्यासाठी दोषी ठरवत आहेत.
तडफडून तडफडून मेला नाग, मृत्यूचा थरार पाहत राहिली नागीण; मग जे केलं… घटनेचा हृदयद्रावक Video Viral
या संपूर्ण घटनेचा थरार @Y Barman नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ बराच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बकरी धावायला तयार होती पण मुलीने दोरी धरली” तर दुसऱ्या युजरन लिहिले आहे, “तिने किमान प्रयत्न तरी केला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.