(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील छत्री गावातील नाग-नागिनच्या एका अनोख्या आणि भावनिक प्रेमकथेने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओने लोकांना विचार करायला लावले की, वास्तविक प्राण्यांनामध्येही भावना असतात. या घटनेत जेसीबी मशिनच्या धडकेने सापाचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे सापाच्या मृत्यूनंतर त्याची प्रेयसी नागीण जखमी बापाजवळ तासनतास उभा राहिली आणि त्याच्या मृतदेहाकडे पाहत राहिली. आपला साथीदार गमावल्याचे दुःख तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक यातील नागिणीची प्रतिक्रिया पाहून थक्क झाले आहेत.
नक्की काय घडलं?
जेसीबी मशिन मैदानात साफसफाईचे काम करत होती, त्याचवेळी नाग-नागिणीची जोडी तेथून जात होती. दुर्दैवाने जेसीबीने धडक दिल्याने नाग यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर नागिन गंभीर जखमी झाली. असे असूनही, नागीण आपल्या साथीदाराच्या मृतदेहाजवळ एक तासापेक्षा जास्त वेळ उभी राहून त्याच्या मृतदेहाकडे टक लावून पाहत राहिली. जखमी सापाने सापाच्या मृतदेहाजवळ कोणालाही तिने येऊ दिले नाही, असे स्थानिक लोकांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून जखमी नागाची सुटका करून उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, नागाची प्रकृती गंभीर असून, त्याची जगण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. सोशल मीडियावर शेअर होताच तो लोकांच्या पसंतीस पडला आणि वेगाने व्हायरल देखील झाला. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेक युजर्स या घटनेबाबत हळहळ व्यक्त करत आहेत. प्राण्यांमध्येही भावना असतात याचे मार्मिक उदाहरण या व्हिडिओतून दिसून आले.
एमपी के शिवपुरी जिले में नाग की मौत के बाद पास खड़ी नागिन का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। नाग की मौत एक जेसीबी की चपेट में आने से हुई बताई जा रही है। लोगों का कहना है कि नागिन करीब एक घंटे तक नाग की लाश के पास फन काढे बैठी रही। #MadhyaPradesh #Viralnews#SnakeViral pic.twitter.com/5cT3EVjjs8
— Krishna Bihari Singh (@KrishnaBihariS2) January 2, 2025
नाग-नागिणीतील अतूट नात्याचे दर्शन घडवणारा हा व्हिडिओ @KrishnaBihariS2 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक युजर्सने पाहिले असून बऱ्याच जणांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे खूप वाईट आहे, त्याचेही कुटुंब आहे, ही एक वेदनादायी घटना आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप दुःखद घटना आहे ही”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.