(फोटो सौजन्य: X)
फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल
काय घडलं व्हिडिओत?
सदर व्हिडिओ हा धार्मिक आणि सांस्कृतील स्थळ उज्जैन येथून समोर येत आहे. सामान्यत: कोणत्याही नवीन दुकानाच्या उद्घाटनासाठी मोठे नेते, अभिनेते किंवा शहरातील प्रमुख व्यक्ती यांना आमंत्रित केले जाते. पण व्हिडिओत मात्र विशेष अतिथी म्हणून रोबोटची हजेरी दिसून आली. एका सँडविच दुकानाच्या उद्घाटनासाठी मालकाने रोबोटला VIP गेस्टचा मान दिला होता. रोबोटनेही हे निमंत्रण स्वीकारले आणि दुकानाच्या उद्घाटनाला त्याने हजेरी लावली.
व्हिडिओमध्ये दोन बाउन्सर्ससोबत रोबोट दुकानाबाहेर एंट्री घेताना दिसतो. त्याच्या स्वागतासाठी लोक जमा झाली होती. अशात रोबोट येताच त्याच्या दुकान मालकांनी दुकानदारांनी पारंपरिक टिळा लावून रोबोटचे स्वागत केले. नंतर त्याच्या गळ्यात लाल रंगाचा स्कार्फ घालण्यात आला. रोबोटने सर्वांसोबत डान्स केला. त्याचा जबरदस्त डान्स इतका प्रभावी होता की उपस्थित सर्वच ते पाहून खुश झाले. दुकानाच्या आत गेल्यानंतर मालकाने रोबोटला सँडविच दाखवल्याचे दिसले. रोबोट सँडविच खाऊ शकत नाही पण तो सँडविच कसा दिसतोय हे मात्र तो नक्कीच पाहू शकतो. संपूर्ण सोहळ्यादरम्यान फक्त रोबोटची उपस्थिती खास ठरली नाही तर भारतीय परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अनोखा संगमही पाहायला मिळाला.
Inauguration of sandwich shop, Ujjain Madhya Pradesh pic.twitter.com/D5658yA30s — NiLAY 📸 (@NilayPhotos) August 23, 2026
हा व्हिडिओ @NilayPhotos नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो व्हूज मिळाले असून यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “व्यावसायिक (कार्यक्रम) चौकशीसाठी, हा रोबोट कसा मिळवता येईल, हे कोणाला माहित आहे का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लवकरच ते वेटर आणि आचाऱ्यांच्या जागी रोबोट्स आणतील. माणसे स्वतःलाच अनावश्यक ठरवतील…”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भ्रष्टाचारी लोकांना बोलवण्यापेक्षा हे कितीतरी पटींनी चांगलं आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






