(फोटो सौजन्य: Instagram)
कोणता जाॅब करतो व्यक्ती?
व्हायरल होत असलेल्या या तरुणाचे नाव जेकब हत्झलर (Jacob Hutzler) आहे. तो एअर ट्रॅफिर कंट्रोलरचे काम करतो. जेकबने अलिकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्याने दाखवले की, तो रोज कशाप्रकारे आपल्या पॅरामोटरवरचा वापर करुन ऑफीसला पोहचतो. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून व्हिडिओने अनेक यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला जेकब आपल्या घरातून बाहेर पडतो. तो आपल्यासोबत त्याचे कामाचे काही सामान घेऊन येतो. पॅरामोटर उडवण्यासाठी तो एका मोकळ्या रस्त्यावर येतो आणि इथून हवेत उडण्याचा आपला प्रवास तो सुरु करतो. सुरुवातीला तो पॅरामोटर आपल्या पाठीवर बांधतो आणि रस्त्यावर धावत सुटतो. काही सेकंदानंतर पॅरामोटर हवेत उडतो आणि याला कंट्रोल करत व्यक्ती हवेतून आपला प्रवास पूर्ण करतो. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, पॅरामोटर म्हणजे मुळात प्रोपेलर बॅकपॅक असलेला एक पॅराग्लायडरच असतो. तुम्ही तुमच्या पाठीवर एक मोटर आणि प्रोपेलर बांधता, पायी चालत झेप घेता आणि उडता.
View this post on Instagram
जेकबचा विना ट्रॅफिक ऑफीसला जाण्याचा हा जुगाड आता सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये त्याच्या या जुगाडावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “बेंगळुरूमध्ये सध्या याची खूप गरज आहे. पण विमान उड्डाण करण्यासाठी किंवा उतरण्यासाठी इथे जागाच नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्त्याने किती अंतर आणि मिनिटे लागतील?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भारतात तर हे शक्यच नाही”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






