(फोटो सौजन्य: Instagram)
‘मला वाचवा…’ सरकारी रुग्णालयात गर्भवतीचा आक्रोश, प्रसूतीदरम्यान मायलेकाचा मृत्यू; Video Viral
याच पार्श्वभूमीवर आता सोशल मिडियावर एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तो चालू रिक्षात मराठी शिकताना दिसून आला. रोजच्या प्रवासात वापरल्या जाणाऱ्या काही निवडक ओळींना त्याने एका पानावर हिंदी आणि मराठीत लिहून ठेवले होते. हे पान रिक्षाच्या आत चिपकवून तो मराठी शिकण्याचा आणि मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. रिक्षाचालकाचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याने घेतलेल्या प्रयत्नांचे यूजर्सद्वारे चांगलेच काैतुक करण्यात येत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका प्रवाशाने मागच्या सीटवर बसून शूट केल्याचे दिसते. पुढे रिक्षाचालक बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यावर त्याने वहितील एक पान चिपकवलेले असते. या पानावर आपण नीट लक्ष दिलंत तर आपल्याला दिसून येईल की, चालकाने हिंदीतील काही ओळींचे भाषांतर मराठीत केलेले असते. प्रवाशांसोबत मराठीत संवाद साधण्यासाठी रिक्षाचालकाने हा अनोखा जुगाड केलेला असतो ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून रिक्षाचालकाच्या प्रयत्नांचे आता चांगलेच काैतुक केले जात आहे. “केलेल्याने होते…” या ओळीचे जिवंत उदाहरण आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळते.
View this post on Instagram
दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @whattsviral.india नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी कंपनीच्या निष्काळजी कृत्यावर टिका व्यक्त केली असून लोकांच्या मानसिकतेवरही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “मराठी बोलावे लागेल हिंदी राष्ट्र भाषा नाही आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “महाराष्ट्रात राहून जर आम्हाला हिंदी येऊ शकते, तर परंप्रातींयांना मराठी भाषा यायलाच हवी”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “काहीतरी नवीन शिकणे ही माणसासाठी चांगली गोष्ट आहे. नवीन भाषा शिकणे ही काही शोकांतिका नाही! हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये साम्य आहे, त्यामुळे हिंदी भाषिक लोक सहजपणे मराठी शिकू शकतात! ज्याप्रमाणे मराठी लोक सहजपणे हिंदी शिकतात, त्याचप्रमाणे ते का शिकू शकणार नाहीत?”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






