Viral News : ...अन् फुकटात चहा प्या, गॅस टंचाईवर पुणेरी जुगाड; पाटी वाचून पोट धरुन हसाल (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
सध्या सोशल मीडियावर एक पुणेरी पाटी व्हायरल होत आहे. युद्धामुळे भारतात गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक छोटे चहाचे स्टॉल बंद झाले आहे. यावर एका चहाच्या स्टॉलवाल्याने लोकांना एक दिलदार ऑफर दिली आहे. एका मीनाक्षी नावाच्या टी-स्टॉल वाल्याने एक खास पाटी लावली आहे. या पाटीवर लिहिले आहे, प्रिय ग्राहक, गॅसची टाकी द्या आणि युद्धसंपेपर्यंत फुकटात चहा प्या. यावर एकही टीपही देण्यात आली आहे. गॅस टाकी फुकट घेणार नाही, त्याचे पैसेही दिले जातील. यावरुन गॅसची टंचाईचा प्रश्न स्पष्टपणे दिसत आहे. सध्या ही पाटी सोशल मीडिय प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल पाटी
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या पाटीवर नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. हा नक्कीच पुणेकर आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका पुणे तिथे काय उणे म्हटले आहे. काहींनी गॅसची टाकी घेऊन येते, पण दिवसाला किती चहा मिळणार असा प्रश्न केला आहे. तर एकाने, युद्ध संपला भाऊ काल पासून….तु गॅस टाकी संपवली असती….म्हणजे….2-3 चहा मला 900/- पडला असता असे गणितच मांडले आहे. तर एकाने गॅसचे पैसे तुम्ही देणार, आम्ही तुम्हाला आणून देणार म्हणजे गॅसच्या रांगेत तुम्हाला उभे राहायचे नाहीय तर असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजीही शेअर केले आहे.
नोकरी मिळेल का? तरुणाने थेट इराणी दूतावासाला केला प्रश्न; मिळालेल्या उत्तराने जिंकली भारतीयांची मने
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






