नेपाळमध्ये भारतीय पर्यटकाला रस्त्यावर थुंकणं पडलं महागात; स्थानिकाने भरस्त्यात साफ करुन घेतला गुटख्याचा डाग, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, एक भारतीय पर्यटकांचा गट कारने नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेला होता. यावेळी प्रवासादरम्यान एका पर्यटकाने खिडकीतून रस्त्यावर गुटखा थुंकला. यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. एका स्थानिक तरुणाने रस्त्यावर थुंकणाऱ्या भारतीय पर्यटकाला चांगलेच सुनावले. एवढेत नाही तर रस्त्या अस्वच्छ झाल्याने त्यांच्याकडून गुटख्याचा डाग साफही करुन घेतला. त्यांना माफी मागायला लावली. पर्यटकांना त्यांच्या चुकीची जाणीव करुन दिली. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, नेपाळी तरुण संतापून म्हणत आहे की, हे इंडिया नाही भाऊ, नेपाळ आहे. इथे घाण करुन नका, पाणी टाका, साफ करुन घ्या. भारतासारख्या मोठ्या देशातून आलात आणि इथे येऊन घाण करता? असा प्रश्नही त्याने केला आहे.
नोकरी मिळेल का? तरुणाने थेट इराणी दूतावासाला केला प्रश्न; मिळालेल्या उत्तराने जिंकली भारतीयांची मने
व्हायरल व्हिडिओ
Even Nepalese are now scolding Indians for poor civic sense. An Indian went to Nepal for tourism.
There, he spat gutka on the road from a moving car. Some Nepalese stopped his car and made him clean the gutka from the road. Even Nepalese are improving now… when will Indians ?… pic.twitter.com/bVe53ybX2w — Oppressor (@TyrantOppressor) April 8, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर एकीकडे नेपाळी तरुणाच्या देशप्रेमाचे कौतुक केले जात आहे, तर भारतीय पर्यटकांच्या कृत्यामुळए सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, अशा लोकांमुळेच परदेशात भारताचे नाव खराब होते असे म्हटले आहे. यावर अनेकांनी सहमती दर्शवली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






