आता हे कॉपी करुन दाखवा! तरुणीने एकामागून एक कचाकच खाल्ली कच्ची कारले; VIDEO पाहून नेटकरी दंग, म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे पाहायला मिळत असते. लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक कधी काय कटेंट बनवतील याचा नेम नाही. कधी जुगाड, कधी स्टंट, कधी भांडणे, तर कधी डान्स रिल्स अशा भन्नाट गोष्टी सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक दंग करुन टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी एकामागून एक कचाकच कारली खाताना दिसत आहे. शिवाय ती कारली टोमॅटो केचअपसोबत खाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तसे पाहता कारले खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत चांगले असते. पण अनेकांना कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही. लोकं कारल्याच्या भाडीकडे डुंकूनही पाहत नाही. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणी कचाकच कारली खाताना दिसत आहे. अनेकांना कारले खाताना उलटी येईल, पण या तरुणीच्या तोंडावर कोणताही भाव दिसत नाही. तिला कारले कडू देखील लागत नसल्यासारखे ती खात आहे. शिवाय तिच्यासमोर भेडीं देखील ठेवलेली दिसत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. अनेकांना हैराण करुन टाकले आहे.
अरेच्चा! हत्तीच्या पिल्लालाही आवरला नाही शिकण्याचा मोह; जंगलातून थेट पोहोचला शाळेत, Video Viral
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @foodie_rinku00 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मल्टिपल व्हेजिटेबल इटिंग चॅलेंज लिहेले आहे. यावरुन तिला कोणीतरी कच्च्या भाज्या खाण्यासाठी चॅलेंज दिले असेल किंवा रिलसाठी हा प्रकार सुरु आहे असे लोकांना म्हटले आहे.
या व्हिडिओवर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तसेच एका युजरने, हिला असे खाताना पाहून मला उलटी येतीय असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने रिल का चक्कर बाबू भैय्या, रिल का चक्कर असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने दिदी कोणत्या ग्रहावरुन आली आहेस असा प्रश्न विचारला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
याला म्हणतात देशी जुगाड! काकांनी दुकान लावण्यासाठी चारचाकीचा केला अनोखा वापर; VIDEO पाहून म्हणाल…
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.